Dharma Sangrah

16 वर्षांनी एकत्र संजय दत्त अन् अरशद वारसी नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Webdunia
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (07:55 IST)
संजय दत्त आणि अरशद वारसी यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. सुपरहिट प्रेंचाइजी ‘मुन्ना भाई’च्या या जोडीच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. लवकरच प्रेक्षकांना ‘मुन्ना’ आणि ‘सर्किट’ची ही जोडी मोठय़ा पडद्यावर पहायला मिळणार आहे.
 
अरशद वारसी आणि संजय दत्त यांच्या आगामी चित्रपटाचे एक पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये ‘मुन्ना’ आणि ‘सर्किट’ दोघेही कैद्याच्या वेशात दिसून येत आहेत. या चित्रपटाच्या शीर्षकाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाची निर्मिती संजय दत्त करणार आहे. तर याचे दिग्दर्शन सिद्धांत सचदेवकडून केले जाणार आहे. हा चित्रपट चालूवर्षीच प्रदर्शित होणार आहे.
 
हे दोन्ही कलाकार यापूर्वी 2007 मध्ये प्रदर्शित ‘धमाल’ चित्रपटात दिसून आले होते. अशा स्थितीत सुमारे 16 वर्षांनी दोघेही पुन्हा एकत्र दिसून येणार आहेत.  संजय दत्त आणि अरशद यांची जोडी राजकुमार हिरानी यांची सुपरहिट प्रेंचाइजी ‘मुन्नाभाई’मध्ये झळकली होती. 2003 मध्ये प्रदर्शित ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि 2006 मध्ये प्रदर्शित ‘लगे रहो मुन्ना भाई’ने प्रेक्षकांचे मोठे मनोरंजन केले होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सलमान खानच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, विनोदाने ते प्रेक्षकांचे आवडते बनले

अंकिता लोखंडे-विकी जैनच्या घरी जीएसटीचा छापा

New Year Special अशी ठिकाणे एक्सप्लोर करा जी तुम्ही यापूर्वी कधीही पाहिली नसतील

अपघातानंतर महिमा चौधरीचे संपूर्ण आयुष्य बदलले, तिने अनेक चित्रपट गमावले

प्रसिद्ध दिग्दर्शकाची पत्नीसह निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments