Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल

Webdunia
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (15:58 IST)
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती बिझनेसमन राज कुंद्रा यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे दोघं आधीपासून अडचणीत सापडले आहेत. यातच त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. काही दिवसांपूर्वीच राज कुंद्राला जामीन मिळाला आहे. त्यानंतर आता त्याचं नाव आणखी एका प्रकरणात पुढे आलं आहे. मात्र यावेळी राज कुंद्रासोबत शिल्पाचेही नाव पुढे आले आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात फसवणूक आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मुंबई पोलिसांच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये  नितीन बराई नावाच्या व्यक्तीने अभिनेत्री शिल्पा शेट्टी,तिचा पती राज कुंद्रा , काशिफ खान  यांच्यासह काही लोकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.हे प्रकरण 2014 चं असून तक्रारीनुसार राज, शिल्पानं बरई यांची एक कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे.
 
काय आहे प्रकरण?
नितीन बराई यांच्या तक्रारीनुसार 2014 मध्ये SFL फिटनेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक काशिफ खान, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी पीडितेला फिटनेस व्यवसायात 1 कोटी 51 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगितले होते.
 
जर त्यानं यांच्या कंपनीची फ्रांचायजी घेतली आणि पुण्याच्या कोरेगाव  परिसरात स्पा आणि जीम सुरु केली तर खूप फायदा होईल. परंतु नंतर काही सुरळीत न झाल्यानं आरोपींनी त्यांचे परत मागितले. त्यानंतर त्यांना धमकावण्यात आलं.
 
बरई यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर आता पोलिसांनी कलम 406,409,420,506,34,120(B) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.मुंबई पोलीस या प्रकरणी सर्वांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांची बाजू जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून त्यांना लवकर संपर्क करण्यात येण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प्रसिद्ध तेलुगू गायिका कल्पना राघवेंद्रने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचे ब्रेकअप!

प्रसिद्ध गायिकेचा आत्महत्येचा प्रयत्न

सोन्याच्या तस्करीप्रकरणी अभिनेत्रीला अटक

विद्या बालनने स्वतःचा बनावट एआय जनरेटेड व्हिडिओ शेअर केला, चाहत्यांना इशारा दिला

सर्व पहा

नवीन

गंगूबाई काठियावाडी'ला 3 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आलियाने साजरा केला आनंद

सोन्याच्या तस्करीशी संबंधित प्रकरणात अभिनेत्री रान्या रावला तीन दिवसांची कोठडी

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आज त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा करत आहे

Women's Day ला मुंबईतील या तीन ठिकाणी नक्की भेट द्या

सानंदच्या रंगमंचावर 'द दमयंती दामले' हे नाटक सादर करण्यात येणार

पुढील लेख
Show comments