Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Singer Taz Death: 'नाचंगे सारी रात' गाणारे पॉप गायक ताझ याचे निधन गेल्या महिन्यात कोमातून आला होता

Singer Taz Death
Webdunia
शनिवार, 30 एप्रिल 2022 (16:27 IST)
'नाचंगे सारी रात', 'गल्लन गोरियां' आणि 'दारू विच प्यार' सारखी हिट गाणी गाणारा पॉप गायक तरसेम सिंग सैनी 'गायक ताज' म्हणून प्रसिद्ध आहे. तो आता या जगात नाही आहे.  वयाच्या 54  व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. यकृत निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 90 आणि 2000 च्या दशकात तो त्याच्या पॉप संगीतासाठी ओळखला जातो. पॉप गायक ताज यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
 
तरसेम सिंग सैनी यांचे 29 एप्रिल 2022 रोजी लंडनमध्ये निधन झाले. असे सांगितले जात आहे की तो बर्याच काळापासून हर्नियाच्या आजाराशी झुंज देत होते. गेल्या 2 वर्षांपासून ते खूप आजारी होता आणि कोमात होते. गेल्या महिन्यात म्हणजे मार्चमध्येच तो कोमातून बाहेर आला होता.
 
गायकाच्या निधनाने संगीतविश्वात शोककळा पसरली आहे. जे त्याला ओळखत होते ते दुःखी दिसत आहेत आणि गायकाला श्रद्धांजली वाहतात. गायक बल्ली सागूने ट्विटरवर गायक ताजचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, 'RIP भाई @tazstereonation तुझी खूप आठवण येईल.'
 
अमाल मलिकनेही ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे.
 
रिपोर्ट्सनुसार, ताजला हर्नियाचा त्रास होता. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती, मात्र, कोविड आल्यामुळे त्यांची शस्त्रक्रिया लांबली. यावर्षी 23 मार्च रोजी त्यांच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून ते कोमातून बाहेर आल्याची माहिती दिली होती.
 
90 च्या दशकात आलेल्या स्टीरियो नेशन या बँडचे मुख्य गायक होता. बॉलीवूडच्या मोठ्या चित्रपटांसाठीही त्याने गाणी गायली आहेत. 'कोई मिल गया', 'तुम बिन', 'गल्लन गोरियन' आणि 'बाटला हाउस' ही गाणी त्यांनी गायली आहेत. बाटला हाऊसमध्ये त्याने लोकप्रिय गायिका ध्वनी भानुशालीसोबत काम केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगणच्या 'रेड 2' चा टीझर प्रदर्शित,आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार

तारक मेहता मध्ये अखेर दयाबेन परत येतीये?

‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे

सनी देओलचा 'लाहोर 1947' या वर्षी प्रदर्शित होणार

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने घेतले उज्जैन येथील बाबा महाकालचे दर्शन

व्हायरल गर्ल मोनालिसा हिला चित्रपट ऑफर करणाऱ्या दिग्दर्शकाला बलात्कार प्रकरणात अटक

'सिकंदर'च्या निर्मात्यांना धक्का, एचडी प्रिंटमध्ये चित्रपट ऑनलाइन लीक झाला

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर Omkareshwar Jyotirlinga

सलमान खानच्या सिकंदरने रिलीज होताच हा अद्भुत विक्रम केला!

पुढील लेख
Show comments