Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

UNLOCK JINDAGI - लॉकडाऊनच्या आठवणींना उजाळा देणारा 'अनलॉक जिंदगी'

Webdunia
बुधवार, 26 एप्रिल 2023 (15:13 IST)
एक ड्राइव्हर, एक व्यावसायिक, दोन हतबल स्त्रिया आणि एक शव. हे चित्र आहे दोन वर्षांपूर्वीचे म्हणजेच लॉकडाऊनमधील. हीच परिस्थिती पडद्यावर पाहायला मिळणार आहे 'अनलॉक जिंदगी' या हिंदी चित्रपटातून. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राजेश गुप्ता असून रियल रील्स प्रस्तुत या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता, देविका दफ्तरदार, शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा, हेमल देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लेखन आणि संवादही राजेश गुप्ता यांचेच असून गीतकार नुसरत फतेही अली खान, राजेश गुप्ता आहेत.
 
लॅाकडाऊनच्या काळात एकमेकांशी संपर्क साधणे कठीण होते, इतकेच काय रक्ताची नातीही या काळात नकळत दुरावत होती. अंगावर काटा आणणाऱ्या या भयाण वास्तवाचे चित्रण या चित्रपटात दिसणार आहे. काही नकारात्मक बाजू दिसत असल्या तरी या काळात काही सकारात्मक बदलही माणसात घडत होते. त्यांची विचारसरणी बदलत होती. नात्यांचे महत्व उमगत होते. या जमेच्या बाजूही या चित्रपटात दिसणार आहेत. पोस्टरमध्ये एक मुलगी आईचे सांत्वन करताना दिसत असून एक ॲम्बुलन्सही दिसत आहे. तर बाजूला दोन व्यक्ती हताश होऊन बसलेले दिसत आहेत. त्यामुळे या सगळ्याचा काय अर्थ आहे, याचे उत्तर आपल्यला १९ मे रोजी मिळणार आहे.
 
दिग्दर्शक आणि निर्माते राजेश गुप्ता म्हणतात, ''कोरोना महामारी हे देशावर आलेले सर्वात मोठे संकट होते, लॉकडाऊनमध्ये सगळ्यांनाच प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले. या परिस्थतीशी जुळवून घेतानाच कुठेतरी नात्यांचे महत्वही यात अधोरेखित करण्यात आले आहे. माणसामाणसांमध्ये झालेले सकारात्मक बदलांचे दर्शन या चित्रपटामध्ये घडेल. ‘अनलॅाक जिंदगी’ पाहताना प्रेक्षकांना कुठेतरी या परिस्थितीचा सामना आपणही केल्याचे जाणवेल. अगदी तुमच्या आमच्या आयुष्यात घडलेली ही गोष्ट आहे.''

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

आता वंदे भारत ट्रेन चित्रपटात दिसणार, शूटिंगला मिळाली परवानगी

प्रसिद्ध गायक जयचंद्रन यांचे निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

51 वा वाढदिवस साजरा करत असलेला अभिनेता हृतिक रोशनने अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या

Republic Day Special नक्की भेट द्या, भारत माता मंदिर वाराणसी

लॉस एंजेलिसच्या जंगलातील आग हॉलिवूडपर्यंत पोहोचली, अनेक सेलिब्रिटींची घरे जळून खाक

पुढील लेख
Show comments