Marathi Biodata Maker

साउथच्या डायरेक्टरसोबत का करणार शाहरुख

Webdunia
गुरूवार, 21 नोव्हेंबर 2019 (15:29 IST)
बॉलिवूडधील किंग खान अर्थात शाहरुख खान हा आपल्या आगामी चित्रपटात साउथमधील प्रसिद्ध डायरेक्टर एटली कुमारसोबत काम करणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झाले नसून 'सनकी' असे नाव असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट पुढील वर्षाअखेर प्रदर्शित होणार असल्याचा अंदाज आहे. या चित्रपटाच्या नावाची अधिकृत घोषणा चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्यानंतर करण्यात येणार आहे. या चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन सीन असणार असून यातील शाहरुखची भूमिका एकदम हटके अशी असणार आहे. या चित्रपटाबाबत एका कार्यक्रमात तेलुगू लेखक हरीश शंकर म्हणाले, एका लेखकापेक्षा मी एक चाहताम्हणून या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहात आहे. हा चित्रपट कधी पूर्ण होईल, हे मला माहीत नाही. पण एटली सर किंग खान एसआरकेला डायरेक्ट करणार आहेत. 
 
एसआरकेचा चाहता म्हणून या जोडीची मला खूपच उत्सुकता आहे. दरम्यान, एटली कुमारबाबत सांगायचे झाल्यास त्यांनी मल्टीस्टारर 'बिगिल' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा आकडा पार केला होता. यात योगी बाबू, जॅकी श्रॉफ, आनंद राज यासारख्या दिग्गज कलाकारांनी काम केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

प्रसिद्धीच्या झोतातून कथा कथनाकडे; जेव्हा बॉलिवूड अभिनेत्री लेखिका बनल्या

जुनैद खान-साई पल्लवीच्या 'एक दिन' निमित्त मुंबईत एका विशेष संगीत कार्यक्रमाची घोषणा

३० वर्षीय अभिनेत्रीचे निधन; घरीच अचानक जमिनीवर कोसळली; तिला वाचवता आले नाही

World Book Day : बॉलिवूड कलाकारांच्या पुस्तकांमध्ये दडलेल्या खऱ्या कथा आणि ग्लॅमरमागील सत्य

उदयपूरच्या पिछोला तलावाच्या काठावर वसलेला सिटी पॅलेस पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय

पुढील लेख
Show comments