Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'जोया फॅक्टर'साठी करावी लागणार आणखी प्रतीक्षा!

Webdunia
मंगळवार, 12 मार्च 2019 (14:14 IST)
गतवर्षी सोनम कपूरच्या 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूम केली. यानंतर सोनम कपूरचा 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटातील सोनमच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. सध्या सोनम 'जोया फॅक्टर' या आपल्या आगामी चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात सोनम पहिल्यांदा साऊथ सुपरस्टार दुलकर सलमानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. चित्रपटाची कथा अनुजा चौहान लिखित 'जोया फॅक्टर' या कादंबरीवर बेतलेली आहे. सोनम यात एका अ‍ॅड एक्झिक्युटीव्हची भूमिका साकारताना दिसणार आहे. जी पुढे भारतीय क्रिकेट टीमसाठी लकी चार्म ठरते. दुलकर सलमान यात क्रिकेट टीमच्या कर्णधाराची भूमिका साकारतोय. साऊथ इंडस्ट्रीचा आघाडीचा स्टार दुलकर सलमानने अलीकडे 'कारवां' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यामुळे 'जोया फॅक्टर' हा त्याचा दुसरा बॉलिवूडपट असणार आहे. सोनम व दुलकरचा हा सिनेमा यावर्षी 5 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण आता या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली आहे. आता हा चित्रपट एप्रिलऐवजी 14 जूनला रिलीज होईल. जून महिन्यातच सलमान खानचा 'भारत' हा चित्रपट रिलीज होतोय. 'भारत' रिलीज झाल्याच्या आठवडाभरात सोनम व दुलकरचा 'जोया फॅक्टर' प्रदर्शित होणार आहे. एकंदर काय तर यानिमित्ताने बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा 'भारत' विरूद्ध 'जोया फॅक्टर' असा सामना रंगताना प्रेक्षक बघणार आहेत. आता या सामन्यात कोण बाजी मारतो, ते बघूच.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुंज्याच्या यशाबद्दल शर्वरीने व्यक्त केला आनंद, म्हणाली - हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे

प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टरवर लैंगिक छळाचा आरोप

'द साबरमती रिपोर्ट' या दिवशी रिलीज होणार, नवीन पोस्टरसह तारीख जाहीर

Border 2: बॉर्डर 2'चं शूटिंग या दिवसा पासून सुरू होणार!

कल्ट क्लासिक पडोसन थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला, सायराबानोने शेअर केली पोस्ट

सर्व पहा

नवीन

कमल हसनचा मणिरत्नम दिग्दर्शित 'ठग लाइफ' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

मोती डुंगरी गणेश मंदिर जयपूर

लाफ्टर शेफच्या सेटवर सुदेश लेहरी अपघाताचा बळी

वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांनी या गोष्टी लक्षात ठेवा

ऑस्कर'मध्ये 'लापता लेडीज'च्या समावेशावर रवी किशनची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments