Festival Posters

अखेर ‘साक्षी धोनी’ सापडली..

Webdunia
गुरूवार, 20 ऑगस्ट 2015 (10:46 IST)
टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचा शोध अखेर संपला आहे. दिग्दर्शक नीरज पांडेने साक्षीच्या भूमिकेसाठी अभिनेत्री कियारा अडवाणीच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. कियाराने फग्ली चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘एम एस धोनी’ हा तिचा दुसराच चित्रपट असेल. दुसर्‍याच चित्रपटात इतकी चांगली भूमिका मिळाल्यामुळे कियारा अत्यंत उत्साहात आहे. ‘फग्ली’नंतर मी चांगल्या भूमिकांच्या शोधात होते. या चित्रपटामुळे माझी इच्छा पूर्ण झाली, अशी प्रतिक्रिया कियाराने दिली आहे. कियाराला माही आणि साक्षी यांची भेट घेण्याचीही इच्छा आहे.
 
चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत महेंद्रसिंग धोनीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. साक्षीच्या भूमिकेसाठी परिणिती चोप्रा, कृती सॅनॉन यांच्या नावांचाही विचार सुरू होता. मात्र ही भूमिका अखेर कियाराच्या पदरात पडली. दिग्दर्शक नीरज पांडेचे ‘अ वेनसडे’ आणि ‘स्पेशल 26’ सारखे चित्रपट सुपरहिट झाले आहेत. धोनीवरील चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

जावईबापूंचे प्रकार

आकाश ठोसरसोबतच्या नात्यावर आणि 'सैराट'च्या मानधनावर रिंकू राजगुरूने दिलं उत्तर

दिपाली सय्यदला फोनवरून धमक्या; अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

बजेट ट्रॅव्हलर्ससाठी गोव्यातील या ५ ऑफबीट जागा; गर्दीशिवाय घ्या निसर्गाचा आनंद!

नीट वादावर बोलल्यामुळे विशाल दादलानीला 'इंडियन आयडॉल १६' मधून काढून टाकण्यात आले का? सत्य समोर आले

Show comments