Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजय देवगणने केला 400 कोटींचे करार

वेबदुनिया
WD
अजय देवगण इतका 'लंबी रेस का घोडा' ठरेल असे 'फुल और कांटे' आला त्यावेळी वाटले होते का? हा चित्रपट निव्वळ चांगल्या गाण्यांमुळे हिट ठरला असे त्यावेळी अनेकांनी म्हटले होते. मात्र सामान्य रंगरूपाच्या अजयने त्यानंतर बरीच मजल मारली आहे. त्याची स्टा व्हॅल्यूही तशीच वाढली असल्याने स्टार इंडियाने त्याच्याबरोबर आता चारशे कोटी रुपयांचा करार केला आहे. या करारानुसार स्टार इंडियाकडे अजयच्या 2017 पर्यंतच्या चित्रपटांचे सॅटेलाईट हक्क असतील.

या करारानुसार पाच वर्षांच्या काळात त्याचे किमान दहा चित्रपट प्रदर्शित होणे गरजेचे आहे. सलमान खानबरोबरही स्टार इंडियाने असाच करार केला आहे. पुढील पाच वर्षांच्या काळात अजयच्या स्टार व्हॅल्यूमध्ये कोणताही फरक पडणार नाही असा या कराराचा अर्थ. हा करार म्हणजे अजयच्या यशाचे आणि स्टारडमचे प्रतीक आहे. त्याच्या अलीकडच्या चित्रपटांचा विचार करता 'गोलमाल-3', 'सिंघम', 'बोल बच्चन' आणि 'सन ऑफ सरदार' हे चित्रपट 'शंभर कोटी' मिळवणारे ठरले आहेत. सध्या अजय भोपाळमध्ये प्रकाश झाच्या 'सत्याग्रह' या चित्रपटाचे शू‍टिंग करीत आहे. त्याला या कराराबाबत विचारले असता त्याने या वृत्ताची पुष्टी केली. अजयचा 'हिम्मतवाला' चित्रपट 29 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments