Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेत्रीच्या बाथरुममध्ये सोन्याचे नळ सापडले

Webdunia
शनिवार, 27 जून 2015 (09:07 IST)
अभिनेत्री लीना पॉलच्या फ्लॅटमधील बाथरुममध्ये सोन्याचा मुलामा असलेला नळ सापडला आहे. फसवणुकीप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री लीना पॉल आणि तिचा लिव्ह-इन-पार्टनर शेखर चंद्रशेखर यांना गेल्या महिन्यात ताब्यात घेतले आहे. 
 
त्यानंतर पोलिसांनी लीना पॉलच्या गोरेगावमधील फ्लॅटची झाडाझडती केली. लीना पॉल गोरेगावमधील 3 हजार स्केवर फूटच्या फ्लॅटमध्ये राहात होती. या फ्लॅटचं महिन्याचं भाडं तब्बल 75 हजार रुपये आहे. 
 
एका पोलीस अधिकार्‍याच्या माहितीनुसार, या अभिनेत्रीच्या फ्लॅटमध्ये 78 हँड बॅग, 8 जॅकेट, 37 सनग्लासेस, 43 ट्राऊजर्स आणि चपलांचे 40 जोड सापडले. शिवाय ब्रँडेड कंपनीच 35 परफ्यूमच्या बॉटल्सही लीना पॉलच्या फ्लॅटमधून जप्त करण्यात आल्या आहेत. या परफ्यूम बॉटल्सच्या किंमती लाखाच्या घरात आहेत. शेखर चंद्रशेखरच्या रुममध्ये 42 जीन्स, 200 टी शर्ट्स, 73 शर्ट्स आणि चपलांचे 80 जोड सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments