Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आईच्या सल्ल्यानंतर केला ‘हेट स्टोरी 3’: झरीन

Webdunia
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2015 (12:03 IST)
दिग्दर्शक अमित पंडय़ाचा ‘हेट स्टोरी 3’ रिलीजसाठी तयार आहे. या सिनेमात सलमान खानसोबत बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या दोन अभिनेत्री डेजी शाह (जय हो फेम) आणि झरीन खान (वीर फेम) बोल्ड अवतारात दिसणार आहेत. डेजी शाहने यापूर्वीच स्पष्टीकरण दिले होते, की तिला हा सिनेमा करण्यासाठी सलमाननेच सल्ला दिला होता. आता झरीन खानला हा सिनेमा करण्यासाठी कुणी सल्ला दिला असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल. झरीनच्या सांगण्यानुसार, तिच्या आईने तिला हा सिनेमा करण्यासाठी प्रेरित केले आहे. 
 
एका प्रतिष्ठित वेबसाइटनुसार, झरीन या सिनेमाविषयी गोंधळात होती. नंतर तिने याविषयी तिच्या आईसोबत बातचीत केली. झरीनच्या आईने तिला हा सिनेमा करण्यासाठी सल्ला दिला. झरीनच्या सांगण्यानुसार, ‘मी प्रत्येक गोष्टीसाठी आईचा सल्ला घेते. या सिनेमाविषयीसुद्धा मी असेच केले. तिने सांगितले, की हा सिनेमा करण्यास काय हरकत आहे. आजकाल प्रत्येक सिनेमात असे सीन्स होतातच. आईच्या अशा बोलण्याने माझ्यातील आत्मविश्वास वाढला. मी हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला.’ तिच्या सांगण्यानुसार, की तिच्या आईचा असा विचार करणे योग्य होते, मात्र ज्याप्रकारे ‘हेट स्टोरी 3’मध्ये सीन्स टाकले आहेत, ते बोल्ड आहेत. 
 
झरीन खान, करण सिंह ग्रोवर आणि डेजी शाहने या सिनेमाविषयी माध्यमांशी चर्चा केली. यादरम्यान झरीनने सांगितले, की सिनेमात सिया दीवानचे पात्र साकारत आहे. ती शरमन जोशीची पत्नी आहे. सोबतच झरीनने असेही सांगितले, की ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यांच्याविषयीचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. आतापर्यंत लोकांनी त्यांच्याविषयी एकच परसेप्शन बनवलेले होते. त्याला सिनेमाच्या ट्रेलरने मोडीत काढले. आपल्याविषयी लोकांच्या बदलत्या भूमिकेविषयी झरीन आनंदी आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments