Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमिरला वेध खासदारकीचे

Webdunia
मंगळवार, 16 सप्टेंबर 2014 (10:53 IST)
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला खासदारकीचे वेध लागले आहेत. आमिरला अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांच्या राज्यसभेतील गैरहजेरीबद्दल प्रश्न विचारताच त्यांच्यावर कोणतीही टीका न करता म्हणाला की, ते माझे मित्र आहेत. जर मला खासदार होण्याची संधी मिळाली तर मी त्याबद्दल नक्कीच विचार करीन. त्यावेळी मी समाजासाठी किती चांगले योगदान देऊ शकतो याकडे विशेष लक्ष केंद्रित करून दररोज हजेरी लावीन. ‘इंडिया टूडे ग्रुप’च्या एका कार्यक्रमामध्ये आमिर आला होता. तेव्हा त्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील महिला ज्या पद्धतीनं दाखविण्यात येतात त्याबदल प्रश्न विचारला असता, आमिर म्हणाला, हो मी मानतो की, चित्रपटात नेहमी महिलांची भूमिका ही बेजबाबदारपणे दाखविण्यात येते, ‘तू चीज बडी है मस्त मस्त’आणि ‘खंबे जैसी खडी है’या सारख्या गाण्यांमुळंदेखील समाजात चुकीचा संदेश जातो.

आपण नेहमी महिलांचा आदर केला पाहिजे. मी स्वीकारतो की, यात माझादेखील समावेश आहे. आजपासून मी असं करणार नाही. मी माझ्या मित्रांसोबतदेखील या विषयावर चर्चा करून येत्या काळात महिलांबदल संवेदनशील राहीन, असंही आमिर म्हणाला.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments