Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आलिया मजूराच्या भूमिकेत

Webdunia
शुक्रवार, 8 मे 2015 (11:55 IST)
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी उडता पंजाब या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटातून आलिया पहिल्यांदाच वेगळ्या ढंगाची व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळणार आहे. आलियाच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास ही तिच्यासाठी आजवरची सर्वात कठीण आणि आव्हानात्मक भूमिका असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आलिया साकारत असलेली ही मुलगी उदरनिर्वाहासाठी पंजाबमध्ये स्थलांतरित झाली असून ती रोजंदारीवर काम करताना दाखविण्यात आले आहे. 
 
आलियाने यापूर्वीच्या सर्व चित्रपटांमध्ये शहरी भागाचे प्रतिनिधित्व करणार्‍या स्त्रियांच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यामुळे आलिया पहिल्याच प्रयत्नात ग्रामीण पार्श्वभूमीची व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारू शकेल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 
 
देढ इशिक्या फेम दिग्दर्शक अभिषेक चौबे याच्या आगामी उडता पंजाब चित्रपटात शाहिद कपूर, आलिया भट्ट आणि करिना कपूर मध्यवर्ती भूमिकेत आहेत.




अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments