Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कंगना झाशीच्या राणीची भूमिका साकारणार

Webdunia
सोमवार, 29 जून 2015 (10:35 IST)
बॉलिवूडमध्ये चरित्रपटात भूमिका साकारणार्‍या कलाकारांच्या यादीत आता कंगना राणावतचा समावेश होण्याची शक्यता आहे. झाशी संस्थानाच्या राणी लक्ष्मीबाई यांच्यावर बनविण्यात येणार्‍या या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी कंगनाची वर्णी लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 
 
केतन मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरूवात होण्यापूर्वी कंगनाला घोडेस्वारी, तलवारबाजीसारख्या काही गोष्टी शिकून घ्याव्या लागणार आहेत. तर ब्रिटिश अधिकारी जनरल ह्युज रोझच्या भूमिकेसाठी हॉलिवूड अभिनेते ह्युज ग्रॅण्ट यांना विचारणा करण्यात आल्याचेही समजत आहे. 
 
झाशीमध्ये 1858 साली ब्रिटिश राजवटीविरोधात झालेल्या उठावाचे राणी लक्ष्मीबाईंनी नेतृत्व केले होते. दिग्दर्शक केतन मेहता यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला असून हा चित्रपट 2005 मध्ये आलेल्या ‘मंगल पांडे’ या चित्रपटाचा पुढचा भाग असल्याचेही त्यांनी सांगितले. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 
 
गेल्या काही चित्रपटांच्या यशानंतर कंगनाची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आता कंगना या भूमिकेचे आव्हान कसे पेलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments