Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कपिल शर्माच्या जागी रितेश देशमुख!

Webdunia
सोमवार, 14 जुलै 2014 (14:44 IST)
विनोदवीर कपिल शर्मा याला आपला पहिला वहिला चित्रपट 'बॅँक चोर' सोडावा लागला आहे आणि त्याच्या जागी वर्णी लागली आहे ती रितेश देशमुख याची. खरे तर काही कारणांमुळे कपिलला या चित्रपटातून यशराज फिल्मने काढून टाकले आणि त्याजागी आता रितेशला घेतले आहे.

हा चित्रपट २0१५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तातडीने या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होणार आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाल्यामुळे खूश झालेल्या रितेशने सांगितले की, मला या चित्रपटाची स्क्रीप्ट, त्यातील भूमिका खूपच आवडली. शिवाय टीमही चांगली आहे. मी त्याच प्रोजेक्टसाठी काम करतो जो प्रोजेक्ट मला आवडतो. आशा आहे की हा चित्रपट माझ्या करिअरसाठी दिशादर्शक ठरेल! नुकताच त्याच्या 'एक व्हिलन' चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली आहे. हा चित्रपट शंभर कोटी रुपये कमवणारा ठरला आहे. याशिवाय त्याने आतापर्यंत केलेल्या 'हमशक्ल', 'ग्रॅण्ड मस्ती', 'क्या सुपर कूल है हम', 'हाऊसफुल', हाऊसफुल २' यासारख्या चित्रपटांत अभिनय केला आणि लोकांच्या पसंतीस तो उतरला आहे. आशा आहे की 'बॅँक चोर' चित्रपटातील त्याची भूमिकाही लोक पसंत करतील!

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments