Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करणजित कौर अशी बनली सनी लिओन..

Webdunia
सोमवार, 18 जानेवारी 2016 (11:44 IST)
2012 मध्ये आलेल्या ‘जिस्म 2’ आणि बिग बॉसमधून भारतीयांना ओळखीचा झालेला चेहरा म्हणजे सनी लिओन.. पण, सनीचं हे खरं नाव नाही.. तिचं खरं नाव आहे करणजित कौर वोहरा.
 
मूळ भारतीय कुटुंबात कॅनडामध्ये सनी लिओनचा जन्म झाला होता. परंतु, जेव्हा तिनं पॉर्न इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा तिचं हे नाव या इंडस्ट्रीसाठी ‘फिट’ नव्हतं. मार्च 2001 साली 19 वर्षीय करणजितला ‘पेंटहाऊस पेट’ म्हणून निवडण्यात आलं होतं. मेन्स मॅगझीनसाठी तिच्या देहाचं प्रदर्शन भरणार होतं. 
 
एका मॅगझीनला इंटरव्ह्यू देताना सनीनं म्हटलंय.. ‘मी तेव्हा केवळ 19 वर्षाची होते. पेंटहाऊस पेट म्हणून निवड झाल्यानंतर जगभरातील रेडिओ कार्यक्रम, टीव्ही आणि मॅगझीन शूटसाठी तुम्हाला पाठवलं जातं.. हे सगळं माझ्यासाठी खूपच नवीन होतं. 
 
तेव्हा एका मॅगझीनला मुलाखत देताना त्यांनी विचारलं की तुला तुझं नाव काय ठेवायचंय? तेव्हा, सहजच मी ‘सनी’ हे नाव कसं वाटेल? शेवटचं नाव काहीही ठेवा.. असं त्यांना म्हटलं.. खरं म्हणजे, सनी तर माझा भाऊ संदीप याचं टोपणनाव होतं.’ आणि झालं.. हेच नाव पुढे सनीची ओळख बनलं. सनीचा ‘मस्तीजादे’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments