Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करिना आणि सैफ अली खान ब्रेक अप?

Webdunia
सोमवार, 10 नोव्हेंबर 2014 (16:32 IST)
प्रत्येक जोडप्यामध्ये काही ना काही बिनसतं.. अनेक जोडप्यांचं यामुळे ब्रेक अप होतं.. सैफ अली खान आणि करिना कपूर यांचंही ब्रेक झालंय. पण, थांबा.. हे त्यांचं ब्रेक अप रिअल लाईफ नाही रिल लाईफमध्ये झालंय. 2012 साली विवाहबंधनात अडकलेले सैफ अली खान आणि करिना कपूर सध्या आपल्या वैवाहिक जीवनात आनंदात आहेत. बेबो लवकरच नवाब सैफला मधलं बोट दाखवून ब्रेक अप करणार आहे. हा सीन आहे रोमँटिक कॉमेडी असलेल्या ‘हॅपी एन्डींग’ या सिनेमातील.. या सिनेमात करिना एक कॅमिओ करणार आहे. ती सैफची गर्लफेंड असेल. पण, काही वेळानंतर ही सैफची गर्लफ्रेंड त्याला मधलं बोट दाखवून ब्रेक अप करेल. आता, हा सीन सिनेमात असेल किंवा नाही हे मात्र सेन्सॉर बोर्डच ठरवू शकेल. दिग्दर्शक कृष्णा डीके यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीमनं हा सिनेमा ‘सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ समोर सादर केलाय. या सिनेमामध्ये इलियाना डिक्रूझ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच गोविंदा, रणवीर शौरी आणि कल्कि कोचलिन यांच्याही या सिनेमात भूमिका असणार आहेत. हा सिनेमा 21 नोव्हेंबर 2014 ला मोठय़ा पडद्यावर झळकण्याची शक्यता आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Show comments