Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छैय्या-छैय्या मॅश-अपवर शाहरुख खूश

Webdunia
शुक्रवार, 22 मे 2015 (10:45 IST)
शाहरुख खानला आपल्या एका सिनेमातील प्रसिद्ध गाणं आणि मायकल जॅक्सनच्या हिट गाण्याचं मॅश-अप इतकं आवडलं की त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्याची वाहवा केली आहे. इतकंच नव्हे तर त्याने हा व्हिडिओ ट्विटदेखील केला आहे. हा व्हिडिओ भलताच भारी असल्याचे सांगत तो तयार करणार्‍यांचेही शाहरुखने कौतुक केले आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुखचं छैय्या-छैय्या गाणं आणि मायकल जॅक्सनचं हिट गाणं डोन्ट स्टॉप यांचं मिश्रण करीत हटकेच मॅश-अप तयार केलं आहे. 
 
शाहरुखचं छैय्या-छैय्या हे गाणं भलतचं हिट झालं होतं. शाहरुख आणि मलायका अरोरा-खान यांनी ट्रेनवर हे गाणं चित्रित केलं होतं. इंटरनेट स्टार सॅम सुई, भारतीय गायक विद्या, क्लेरिनेट शंकर टकर आणि बीटबॉक्सर कुर्त श्नीडर यांनी या व्हिडिओ तयार केला आहे. कुर्त श्नीडरने हा व्हिडिओ 17 मे रोजी हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता. त्याला आतापर्यंत 342,634 हिट्स मिळाले आहेत. तर शाहरुखने 18 मे रोजी या व्हिडिओचा ट्विट केला. त्याचा हा ट्विट आतापर्यंत 1,543 जणांनी रीट्विट केला आहे. तर 2,833 जणांनी तो फेव्हरिट केला आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

सिद्धयोगी मकरंद देशपांडे‘अल्याड पल्याड’ चित्रपटात दिसणार वेगळ्या भूमिकेत

Show comments