Dharma Sangrah

जासूसी करून कॅट वैतागली!

Webdunia
सोमवार, 13 जुलै 2015 (10:33 IST)
बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री कटरिना कैफ हल्ली ‘जासूसी’ करून कंटाळलीय. आता तुम्ही म्हणाल ‘कॅट’ कुणाची जासूसी करतेय..? पण, कॅट सध्या ‘जासूसी’ आपल्या रीयल लाईफमध्ये नाही तर ‘रील’ लाईफमध्ये करतेय. 
 
कॅटरिना सध्या रणबीर कपूर प्रॉडक्शनच्या पहिलाच चित्रपट असलेल्या ‘जग्गा जासूस’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ‘जग्गा जासूस’चं सध्या री-शूट सुरू आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कॅटरिना याच री-शूटला आता वैतागलीय. चित्रपटाचं शूटिंग 2013 मध्ये सुरू झालंय.. पण, ते अजूनही रेंगाळतच चाललंय. ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाचं अनुराग बासू दिग्दर्शन करतोय.. आणि परत परत तेच तेच शूटिंग करून वैतागलेली कॅटरिना अनुरागला आता आपल्या डेटस् द्यायला तयार नाही. त्यामुळेच, अनुराग आणि कॅटरिना यांच्यातही थोडीफार कुरबूर सुरू आहे. 
 
या चित्रपटाचं अजूनही 70 दिवसांचं काम बाकी आहे. महत्त्वाचं म्हणजे, जग्गा जासूस या चित्रपटातून रणबीर कपूर पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात उतरतोय. हा चित्रपट नोव्हेंबरपर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

सुशांत शेलारने विजय पाटकर यांच्यावर ५७ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

पंजाबी आणि बॉलीवूड गायक दिलजीत दोसांझ यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी

अमिताभ बच्चन यांच्या रविवारच्या दर्शनामुळे गोंधळ उडाला, व्हिडिओ व्हायरल

Show comments