Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जॉन अब्राहम आणि प्रिया काडीमोड घेण्याच्या वाटेवर?

Webdunia
रविवार, 30 ऑगस्ट 2015 (21:56 IST)
अभिनेता जॉन अब्राहम पत्नी प्रिया रुंचालसोबत घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याच्या अफवा जोर धरत होत्या. मात्र घटस्फोटाच्या वृत्ताचं खंडन करत जॉनने आमचं सर्व काही आलबेल असल्याचा खुलासा केला आहे. ‘आम्हा दोघांचं एक छोटंसं विश्व आहे. या विश्वात सारं काही आनंदात सुरु आहे. लोकं विनाकारण घटस्फोटाच्या अफवा पसरवतात, तेव्हा मला जास्त वाईट वाटतं.’ असं जॉन म्हणतो. प्रिया आणि जॉन गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले होते. मात्र उच्चशिक्षणानिमित्त प्रिया अमेरिकेत राहत आहे, तर जॉन चित्रपटाच्या शूटिंगमुळे भारतात आहे. मात्र दोघांच्या वेगळं राहण्याचा चुकीचा अर्थ लावल्याचं म्हटलं जातं. ‘मी गप्प बसतो, याचा चुकीचा अर्थ लावला जातो. पण त्यामुळेच माझ्याबाबत अफवांना ऊत येतो. याचा मला आणि माझ्या कुटुंबीयांना खूप त्रास होतो. आम्ही काही बोलत नाही, याचा अर्थ अफवांना खतपाणी घालावं असा होत नाही.’ या शब्दांत जॉनने संताप व्यक्त केला आहे. ‘मी एक विनोद चित्रपट करतोय, मात्र माझ्या आयुष्याची कोणीतरी मस्करी करतंय, याची मला साधी कल्पनाही नव्हती. या सर्व अफवांना मी पूर्णविराम देतो,’ असं जॉन अब्राहमने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments