Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दीपिकाचं ‘माय चॉईस’

Webdunia
बुधवार, 1 एप्रिल 2015 (10:14 IST)
अभिनेत्री दीपिका पदुकोणचा हा व्हिडिओ अनेक महिलांना प्रेरणादायी ठरणार आहे, दीपिकाने आपली चॉईस ठरवली आहे. दीपिकाने नेमकं या व्हिडिओत काय म्हटलंय पाहा.

‘वो इंडिया’सोबत दीपिकाने हा व्हिडिओ शूट केला आहे, ज्यात म्हटलंय, माझं शरीर, माझे विचार, माझा निर्णय, महिला सशक्तीकरणावर आधारित या व्हिडिओचं नाव आहे, ‘माय चॉईस म्हणजेच माझा निर्णय’.

दीपिका या व्हिडिओत म्हणते, ‘मी एक महिला आहे, मला माझ्याशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत, हा अधिकार कोणते कपडे मी परिधान करावेत, विवाह करावा किंवा करू नये किंवा विवाहाच्या आधी सेक्स करावा किंवा करू नये, हा देखील माझा निर्णय आहे.’

महिलांचे खासगी निर्णयांवर व्हिडिओमध्ये दीपिका म्हणते, ‘मी कोणत्याही पुरूषासोबत प्रेम करत असेन किंवा महिलेशी, अथवा दोघांवर, हा निर्णय माझा आहे.’ 2 मिनिटं आणि 34 सेकंदाचा हा व्हिडिओ होमी अदजानिया यांनी निर्देशित केला आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प