Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धार्मिक गोष्टींवर सनी लिऑनचा विश्वास!

Webdunia
मंगळवार, 28 जुलै 2015 (10:13 IST)
बॉलीवूडची बेबी डॉल अर्थात अभिनेत्री सनी लिऑन नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्यावर स्पष्टपणे भूमिका मांडत असते. कोण काय विचार करेल, याबाबत सनी लिऑन फारसं विचार न करता आपलं मत मांडत असते. पॉर्न स्टार म्हणून करिअरला सुरुवात केलेली सनी लिऑन सध्या बॉलीवूडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करते आहे. 
 
सनी लिऑन म्हणजे चंदेरी दुनियेतील एक हॉट अभिनेत्री वगैरे सर्व खरं असलं, तरी ती खूप धार्मिक आहे. हे काही आम्ही म्हणत नाही.. तर स्वत: सनी लिऑननेच असं सांगितलं आहे. खरंतर तिने सांगण्याचीही गरज नव्हती. कारण पाश्चिमात्य संस्कृतीत वाढलेल्या डॅनियल वेबरशी सनी लिऑनने गुरुद्वारात लग्न केलं आणि तेही तिच्या धार्मिक परंपरेनुसारच. सनी लिऑनने डॅनियल वेबरशी गुरुद्वारात अगदी सीख पद्धतीने लग्न केलं. कारण ग्लॅमरच्या दुनियेत ती वावरत असली, तरी धार्मिक गोष्टींवर तिचा प्रचंड विश्वास आहे. सनी लिऑनचे आई-वडील प्रचंड धार्मिक होते. ज्यावेळी सनी लिऑनने तिचं लग्न गुरुद्वारात केलं, त्यावेळी तिचे आई-वडील उपस्थित नव्हते. त्यांनी लग्नाला उपस्थित राहावं, अशी सनी लिऑनची फार इच्छा होती. 
 
लहानपणी तर सनी लिऑन दर रविवारी गुरुद्वारात जात असे. तिथे गुरुवाणीही करत असे. आताही कधी शूटिंगच्या व्यस्त कामांमधून वेळ मिळाला तर सनी लिऑन पती डॅनियल वेबरसोबत गुरुद्वारात आवर्जून जाते.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments