Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेशुद्ध न होता हृतिकने केली ब्रेन सर्जरी!

Webdunia
बुधवार, 1 ऑक्टोबर 2014 (12:29 IST)
हृतिक रोशनने 'बँग बँग' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणापूर्वी ब्रेन सर्जरी केली होती. अलीकडेच, 'बँग बँग'च्या प्रसिद्धीच्या कार्यक्रमामध्ये काही गोष्टी सांगितल्या. हृतिकच्या सांगण्यानुसार, 'बँग बँग'च्या चित्रीकरणाला जाण्यापूर्वी तो जेव्हा ट्रेड मील मशीनवर चालत होता, तेव्हा त्याला जाणवले की, त्याला चक्कर येत आहे. हात-पाय आपोआप थरथरायला लागले होते. त्यानंतर त्वरित त्याने डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी त्याला ताबडतोब ब्रेन सर्जरी करण्यास सांगितले. त्याने तीन विविध डॉक्टरांशी बातचीत केली, सर्वांनी एकसारखाच सल्ला दिला. ज्या डॉक्टरांनी हृतिकला सल्ला दिला होता त्याच डॉक्टरांकडून सर्जरी केली. हृतिकने सांगितले की, सर्जरी चालू असताना तो बेशुद्ध नव्हता. त्याला सर्जरीमधील सर्व हालचाली कळत होत्या. तो भीती कमी करण्यासाठी गाणे गुनगुनत होता; परंतु डोक्यातून वाहणारे रक्त पाहून त्याची बोलती बंद झाली होती. हृतिकने सांगितले की, ब्रेन सर्जरी बेशुद्ध होऊन करू नये. कारण आपल्या हात-पायांची हालचाल आपल्याला कळत नाही. मेंदू व्यवस्थित काम करत नसेल तर आपल्याला ते जाणवते. त्यामुळे हृतिकने ब्रेन सर्जरी बेशुद्ध न होता केली.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments