Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बॉक्स ऑफिसवर ‘जंगल जंगल सुसाट चली है..

Webdunia
डिस्नेचा लाईव्ह-अँक्शन अँडव्हेंचर सिनेमा ‘द जंगल बुक’ची गाडी बॉक्स ऑफिसवर सुसाट चालली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 9.76 कोटी रुपयांचा गल्ला जमवत विक्रमी वाटचाल केली आहे.
 
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सिनेमाला सुटीमुळे पहिल्याच दिवशी चांगली ओपनिंग मिळाली. तीन दिवसांच्या लाँग विकेंडचा फायदा चित्रपटाला मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांना लागलेल्या सुट्टय़ांचाही फायदा सिनेमाला होणार आहे. अक्षयकुमारच्या एअरलिफ्टनंतर जंगल बुक हा 2016 मधला सर्वात मोठं ओपनिंग मिळालेला दुसर्‍या क्रमांकाचा सिनेमा ठरला आहे. बॉलिवूड ट्रेड अँनलिस्ट तरण आदर्श यांनी टिटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. सिनेमाचं वैशिष्टय़ म्हणजे संपूर्ण सिनेमात एकच मानवी पात्र आहे, ते म्हणजे मोगलीचं. मोगलीची भूमिका साकारणारा लहानगा नील सेठीवर सर्व प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रियांका चोप्रा, इरफान खान, नाना पाटेकर, ओम पुरी, शेफाली शाह, नील सेठी यांचे व्हॉईस ओव्हर व्यक्तिरेखांना लाभले आहेत.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments