Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बॉलीवूड स्टार्सचे असे कसे हे फॅन्स

Webdunia
शाहरुख खानची फॅन रिलीज होणार आहे. अशात शाहरुखला आठवले की त्यांचे कसे कसे फॅन्स आहेत आणि ते आपल्या सुपरस्टारला भेटण्यासाठी काय काय करतात... पाहू अश्याच काही फॅन्सचे किस्से आणि त्यांची आपल्या आवडत्या स्टारप्रती वेडेपणा..
शाहरुख जर्मनीत एक अश्या फॅनला भेटले जिचे दोन्ही पाय निष्क्रिय होते. आणि ती सतत म्हणायची की एकदा शाहरुखला भेटले की मी आपोआप चालू शकेन. जेव्हा शाहरुख तिला भेटला तेव्हा ती खरोखर काही पाऊल पुढे टाकून त्याच्या जवळ आली. त्या फॅनची ही जिद्द आणि विश्वास पाहून शाहरुखदेखील हैराण झाला.

 

एकदा शाहरुखचा एक फॅन त्याच्या बंगल्याची भिंत फांदून आत शिरला होता. त्याला लगेच सिक्युरिटीने धरून पोलिसांच्या ताब्यात दिले. पण जेव्हा पोलिस त्याची पिटाई करत होती तेव्हाही तो मोठ्या स्टाइलने म्हणत होता की मारता कशाला? मी चोर नाही, मी तर फक्त शाहरुखच्या स्विमिंग पुलमध्ये अंघोळ करू इच्छित होतो तिथे शाहरुख रोज अंघोळ करतो.

अमिताभ बच्चन यांचे तर अगणित फॅन्स आहे पण अमिताभ सांगतात की कुली सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा ते मरणप्राय यातना करत होते तेव्हा सूरत येथे राहणार्‍या त्यांच्या एका फॅनने त्यांच्या तब्बेतीसाठी नवस केला होता. अमिताभ यांच्या तब्बेतीत सुधार झाल्यावर तो सूरत ते मुंबई उलट पायाने चालत आला आणि सिद्धी विनायकाचे दर्शन केले. तो सिद्धी विनायक पोहचल्यावर जया बच्चनने स्वत: त्याचे स्वागत केले होते. आता जया बच्चन त्याला भाऊ मानते आणि दरवर्षी राखी बांधते. 


अनेक मुली सलमान खानच्या फॅन आहेत पण बिहार येथील पटनामध्ये राहणार्‍या दोन बहिणींना भेटून सलमानला खूप खुशी झाली. या बहिणी आपसात जुळलेल्या असून यांनी सलमानसाठी तेव्हा तीन दिवस उपाशी राहून नमाज वाचली जेव्हा हिट अॅड रन केसचा निकाल लागणार होता. सलमानला जामीन मिळाल्यावर त्याने या दोघी बहिणींना आपल्या घरी बोलावले आणि अख्खा दिवस त्यांच्यासोबत घालवला.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments