Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मला अनुष्का का आवडली, माहीत आहे का?

Webdunia
मंगळवार, 5 मे 2015 (14:56 IST)
विराट कोहली जरी देशातील मोस्ट Desirable man ठरला असला तरी त्याच्या मते जगातील मोस्ट Desirable woman  ही त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा आहे. त्यानं आता अनुष्का आपल्याला का आवडते हे रिविल केलंय. याचबरोबर आपल्या आईबाबत तो अधिक सेनसिटीव्ह का आहे हेदेखील त्यानं सांगितलंय.
 
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे सध्याच्या घडीला देशातील सर्वाधिक चर्चित कपल आहे. या दोघांच्या लव्ह-अफेयरच्या चर्चा अगदी चवीनं चाखल्या जातात. आणि अनेकदा विराट या चर्चाना विषयही स्वत:हून पुरवत असतो. 
 
वर्ल्डकपदरम्यान आपली गर्ल फ्रेंड अनुष्काबाबत ‘माय लव्ह’ असं ट्विट करुन त्यानं आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. यानंतर वर्ल्डकपमधील भारताच्या पराभवानंतर अनुष्कावर केल्या जाणार्‍या टीकेमुळे रागावलेल्या विराटने थेट फॅन्सवरच हल्लाबोल केला होता. आता त्यानं आपल्याला अनुष्का का आवडते हे स्पष्ट केलंय.
 
माझ्यासाठी माझी गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा ही जगातील मोस्ट Desirable woman आहे. ती खूप प्रेमळ आणि साधी व्यक्ती आहे. ती माझ्यासारखीच प्रामाणिक आहे. तिचा प्रामाणिकपणाच मला सर्वाधिक भावतो. तिचा हाच गुण मला तिच्याकडे अधिक आकर्षित करतो.
 
अनुष्काच्या प्रेमात विराट किती आकंठ बुडालेला आहे हे यावरुनच स्पष्ट होतं. दरम्यान आपल्याला फॅन्सने मोस्ट Desirable man साठी का निवडलं असावं या प्रश्नावर कोहली म्हणतो की आईवर असलेलं आपलं प्रेम, अनुष्काशी असलेल्या रिलेशनचा आपण करत असलेला आदर, बॉय नेक्स्ट डोअर प्रतिमा आणि सेक्सी लूक ही कारणं असावीत.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी