Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मल्लिका चक्क अभिनय करतेय!

Webdunia
IFMIFM
मल्लिका शेरावत चित्रपटांऐवजी इतर बाबींसाठीच जास्त चर्चेत असते. पण आता यापुढे आपल्या अभिनयाविषयी चर्चा होईल, असा तिचा दावा आहे.

मल्लिकाची 'मान गए मुगल-ए-आझम' व 'अगली और पगली' हे दोन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. एरवी चित्रपटात अंगप्रदर्शन आणि चुंबनदृश्ये नसतील तर म्हणे मल्लिकाच चित्रपट साईन करत नाही. पण या दोन चित्रपटात मात्र यातले काहीही नाही. या चित्रपटात आपण एका सशक्त भूमिकेत असून आपल्या अभिनयाविषयी लोकांना चर्चा करावी लागेल, असा विश्वास ती व्यक्त करते.

' अगली और पगली' हा चित्रपट प्रीतीश नंदी कम्युनिकेशनची निर्मिती आहे. या संस्थेच्या 'प्यार के साईड इफेक्ट्स' या चित्रपटात मल्लिकाने काम केले आहे. या चित्रपटात ती रणवीर शौरीबरोबर असेल. 'मान गए मुगल-ए-आझम'मध्ये ती राहूल बोसची नायिका आहे. के. के. मेनन आणि परेश रावल सारखे तगडे कलावंत तिच्याबरोबर आहेत. परेश रावल म्हणे तिच्या अभिनयाने भलतेच प्रभावीत झाले आहेत. संजय छैल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाकडून मल्लिकाला मोठ्या अपेक्षा आहेत.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments