Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माझ्या कामाचा मुलावर काहीही परिणाम नाही: मलायका

Webdunia
बुधवार, 22 एप्रिल 2015 (09:59 IST)
'मुन्नी बदनाम' फेम अभिनेत्री मलायका अरोरा-खान बॉलिवूडमध्ये आयटम नंबरसाठी प्रसिद्ध आहे. विशेष बाब म्हणजे तिच्या मुलानंही आईची ही प्रतिमा सहज स्वीकारली आहे. ‘मी केलेल्या आयटम साँगचा माझ्या मुलावर काहीही परिणाम होत नाही’ असं मलायकानं स्पष्ट केलंय. 'दिल से' या चित्रपटातील 'छैय्या छैय्या', 'दबंग'मधील 'मुन्नी बदनाम' या गाण्यांमधील दिलखेचक नृत्यानं प्रेक्षकांची दाद मिळवणार्‍या मलायका अरोरा खानचा मुलगा अरहान आता 13 वर्षाचा झाला आहे.

अरहानला त्याच्या आईच्या इमेजविषयी काय वाटते याची उत्सुकता सर्वानाच असते. याविषयी मलायकाला प्रश्न विचारला असता मलायका म्हणते, मला डान्स करायला आवडते आणि ते मी मनापासून इन्जॉय करते. माझ्या कामाचा माझ्या मुलावर काहीही परिणाम होत नाही. त्याला या गोष्टींची सवय झाली आहे. माझा मुलगा अरहान अजून लहान आहे. पण त्याला माझं गाणं आवडलं तर तो स्वत:च मला येऊन सांगतो, असं मलायकानं म्हटलं आहे.

गाणी हे चित्रपटातील महत्त्वाचे घटक असून गाण्यांमध्ये काम करणं हा नेहमीच मजेशीर अनुभव असतो. फक्त ते गाणं कसं चित्रित केलं जातं आणि ते कसे दाखवलं जाईल हे महत्त्वाचं असतं, असं मलायका म्हणाली.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments