Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माझ्यातील मुलगी हरवली

Webdunia
सोमवार, 24 मार्च 2014 (18:11 IST)
बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोमच्या आयुष्यावर आधारित सिनेमा करता करता माझ्यातली मुलगी हरवली आहे, मी मुलगाच होऊन बसले आहे की काय, असे वाटू लागल्याचे प्रियांकाने जाहीरपणे सांगितले. लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्पवर उतरलेल्या प्रियांकाने आपल्या या भावनांना वाट मोकळी करून दिली. प्रियांकाला या सिनेमात मेरी कोमसारखे दिसण्यापासून ते तिच्यासारखे असण्यापर्यंत तिला चांगलीच मेहनत घ्यावी लागली आहे. 
 
चमचमीत खाणे, मेकअप, स्टाईलिंग या सगळ्या मुलींच्या म्हणून गोष्टींना काट मारायला लागणे ही एक गोष्ट समजून घेता येईल. पण, मेरी कोम बॉक्सर असल्यामुळे तो खेळगुण साकारायचा तर जीवतोड व्यायाम, मेहनत तिला करावी लागली आहे. या सगळ्याची आठवण प्रियांकाला फॅशन डिझाईनर नीता लुल्ला यांचा बेज रंगाचा काफ्तान परिधान करून, नटून थटून रॅम्पवर उतरली तेव्हा झाली आणि तिला बोलल्याशिवाय राहवले नाही. मागे कधीतरी मेरी कोम करता करता मी मुलगाच झाले आहे की काय असे तिने म्हटले होते. त्याचीच री ओढत आता नटून-थटून लोकांसमोर येताना काय वाटतेय, असा प्रश्न तिला विचारला गेला. 
 
तेव्हा कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझ्यातली स्त्रीसुलभ नजाकत माझ्याकडून काढून घेणे अशक्य आहे, असे ती पहिल्यांदा बोलून गेली. पण, मेरी कोम करताना या स्त्रीसुलभ हौसेला, नटण्यामुरडण्याला चांगलीच काट मारावी लागली होती आणि त्यामुळे मन अस्वस्थ होते, एक बेचैनी मनात होती, हेही तिने कबूल केले.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments