Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रध्वजाचा अवमान, अभिनेत्री मल्लिकाविरुद्ध गुन्हा

Webdunia
शुक्रवार, 5 सप्टेंबर 2014 (16:41 IST)
बॉ‍लिवूडची अभिनेत्री मल्लिका शेरावतविरुद्ध राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. हैदराबादमधील कोर्टाने आदेश दिल्यानंतर फलकनुमा पोलिस ठाण्यात मल्लिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
 
मल्लिकाने आपल्या आगामी 'डर्टी पॉलिटिक्स' या चित्रपटामध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोन याचिकाकर्त्यांनी मल्लिका विरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरूनच कोर्टाने तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. 
 
मल्लिकाच्या 'डर्टी पॉलिटिक्स'चे गेल्या काही दिवसांपूर्वी पोस्टर लॉन्च झाले. लालदिवा असलेल्या एका गाडीवर मल्लिका बसली असल्याचे या पोस्टरवर दिसत आहे. विशेष म्हणजे तिने आपल्या अंगावर राष्ट्रध्वज परिधान केला असल्याचे दाखवण्यात आले आहे. या पोस्टरवरूनच तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments