Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नासाठी प्रपोज अन् विराट-अनुष्काचं ब्रेकअप

Webdunia
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2016 (10:04 IST)
क्रिकेट स्टार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेमप्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. मात्र, आता या जोडप्यामधील सारं काही आलबेल नसल्याचं समजतं आहे. त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपची चर्चाही जोरदार सुरू आहे. 
 
विराट कोहलीनं प्रेयसी अनुष्काला लग्नासाठी प्रपोज केलं. पण आता लगेचच त्यासाठी ती तयार नाही त्यामुळेच तिने हा प्रस्ताव धुडकावून लावला. तेव्हापासून या दोघांमध्ये दुरावा आला आहे. अनुष्कानं नुकताच दबंग सलमान खानचा ‘सुल्तान’ सिनेमा साइन केला आहे. त्याचं शूटिंगही सुरू झालं आहे. अनुष्का शर्माला सध्या आपल्या करिअरवर लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे 2017 च्या आधी ती लग्न करू इच्छित नाही. 
 
आता या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत. या दोन्ही स्टार्सने एक दुसर्‍याला सोशल साइटवर अनफॉलो केलं आहे. तसंच मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्याभरापासून दोघांचं बोलणंही बंद आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सेलिब्रेटी जोडप्यांचं ब्रेकअप झालं आहे. सुरुवातीला कॅटरिना-रणबीर, फरहान-अधुना यांचं ब्रेकअप झालं. तर दुसरीकडे अरबाज आणि मलायका यांच्याही घटस्फोटाबाबत काही बातम्या येत आहेत.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments