Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शाहिद-मीराचा विवाह होणार नाही!

Webdunia
मंगळवार, 31 मार्च 2015 (11:25 IST)
’बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरच्या फिमेल फॅनसाठी दिलासादायक बातमी आहे. शाहिद दिल्लीवाली गर्लफ्रेण्डसोबत विवाह करणार नसल्याची माहिती मिळत आहे. शाहिद कपूर दिल्लीत राहणार्‍या मीरा राजपूतसोबत यंदाच विवाहबद्ध होणार असल्याची जोरदार चर्चा होती. पण ही बातमी अजिबात खरी नाही. शाहिदसोबत विवाह ही फक्त अफवा असल्याचं कळतं.

मीरा राजपूत दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमध्ये इंग्लिश (ऑनर्स)ची तिसर्‍या वर्षात शिकते. मीरा शाहिदसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं वृत्त खोटं आहे, असं मीराच्या जवळच्या मैत्रिणीने सांगितलं. ती शाहिदला डेट करत नाही आणि त्याच्याशी लग्नकरण्याचाही तिचा इरादा नाही. शाहिद तिच्यापेक्षा 13 वर्षानी मोठा आहे. शाहिद केवळ तिचा कौटुंबिक मित्र आहे, असं मीराच्या मैत्रिणीने स्पष्ट केलं. मीरा तिच्या वैयक्तिक आयुष्याला फार महत्त्व देते. ती फक्त तिच्या मोजक्याच मित्र-मैत्रिणींसोबत दिसते. ती अभ्यासातही हुशार आहे. CTE परीक्षेत दिल्ली विद्यापीठात ती दहाव्या क्रमांकावर होती, असंही मैत्रिणीने सांगितलं.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments