Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रध्दाचा गुरू कोण?

Webdunia
सोमवार, 4 एप्रिल 2016 (10:53 IST)
चंदेरी पडद्यावर सध्या टागर श्रॉफ आणि श्रध्दा कपूर यांच्या ‘बागी’ चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे. त्याचे कारण म्हणजे या दोघांचे चित्रपटातील स्टंट सीन. हे स्टंट सीन दोघांनी स्वत: केले आहेत. त्यासाठी त्यांनी कोणाचाही आधार घेतला नाही. टागर स्वत: श्रध्दाला याचे प्रशिक्षण देत आहे. ‘बागी’ चित्रपटात स्टंट सीनचे आव्हानात्मक काम स्वीकारून श्रध्दाने या चित्रपटात काम करण्याचे मान्य केले. यासाठी तिला टागरची चांगलीच मदत मिळाली आहे. मार्शल आर्टमध्ये निपुण असलेल्या टायगरने श्रध्दाला याचे धडे देण्यास सुरवात केली आहे. चित्रपटाच्या कथानकाची मागणी असल्याने सध्या हे दोघेही स्टंट सीनसाठी मोठी मेहनत घेत आहेत. याबाबत श्रध्दा कपूर म्हणाली की, अशा पध्दतीने चित्रपटात पहिल्यांदाच स्टंट सीन करत आहे. टायगरला स्टंट सीनचा चांगला अनुभव असून तो त्यात निपुण आहे, असे माझे मत आहे. त्याच्या या अनुभवाचा फायदा होत असून स्टंट सीनबाबत त्याच्याकडून खूप काही शिकण्यास मिळाले आहे. ‘हिरोपंथी’ या 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची टीम आता ‘बागी’साठी काम करत आहे. निर्माता साजिद नाडियादवाला, दिग्दर्शक सबीर खान आणि अभिनेता टायगर श्रॉफ हे त्रिकूट या चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आले आहे. येत्या 29 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments