Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सनीनं केलं शर्लिनला आऊट

Webdunia
गुरूवार, 17 एप्रिल 2014 (17:09 IST)
एमटीव्हीच्या ‘वेब्ड’ आणि ‘हॉन्टेड वीकेन्डस्’ या शोला होस्ट केल्यानंतर सनी लिओन आता रिअँलिटी शो ‘स्प्लिट्सविला’च्या सातव्या सीझनला होस्ट करणार आहे. विशेष म्हणजे सनीनं शर्लिनच्या हातून हा शो हिरावून घेतलाय. कारण मागील सीझन शर्लिननं होस्ट केलं होतं. अमेरिकेतील रिअँलिटी शो ‘फ्लेवर ऑफ लव्ह’चं हिंदी रूप म्हणजे ‘स्प्लिट्सविला’. या शोमध्ये प्रेमाच्या शोधात निघालेल्या तरुण-तरुणींना एका व्हिलामध्ये ठेवलं जातं. प्रत्येक आठवडय़ाला त्यांना वेगवेगळे टास्क दिले जातात. या दरम्यान शोमध्ये उपस्थित असलेल्या स्पर्धकांसोबत त्यांना जोडी बनवावी लागते. शोच्या शेवटी जी जोडी जिंकते त्यांना पुरस्कार मिळतो. जोडीतल्या दोन्ही व्यक्तींमध्ये ती रक्कम वाटली जाते. शोची तारीख आणि स्पर्धकांबाबत चॅनलच्यावतीनं काही माहिती दिली गेली नाहीय. कॅनडातील पॉर्नस्टार म्हणून काम केलेली आणि बॉलिवूडमध्ये एंट्री केलेली अभिनेत्री सनी लिओननं सुरुवातच रिअँलिटी शोमधून केली. बिग बॉस 5 मध्ये तीही एक स्पर्धक होती. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments