Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सनीवर आली हॉटेलमध्ये राहाण्याची वेळ

Webdunia
शनिवार, 23 मे 2015 (10:44 IST)
पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओन आता अडचणीत सापडली आहे. मुंबईत ज्या घरात ती वास्तव्याला होती, ते घर तिच्याकडून रिकामे करुन घेण्यात आले आहे. त्यामुळे तिच्यावर हॉटेलमध्ये राहण्याची वेळ आली आहे. बातम्यांनुसार, आपल्या अँडल्ट स्टार इमेजमुळे सनीला मुंबईत स्वत:चे घर खरेदी करण्यात अनेक अडचणी येत आहेत. याच कारणामुळे ती अभिनेत्री सेलिना जेटलीच्या 
 
फ्लॅटमध्ये भाडय़ाने राहात होती. सेलिनाने सनीची अडचण लक्षात घेऊन तिला आपला फ्लॅट भाडय़ाने दिला होता. मात्र आता सेलिनाने सनीला घर रिकामे करण्यास सांगितले. याचे कारण म्हणजे, सेलिनाच्या मते सनी तिच्या फ्लॅटची नीट काळजी घेत नाहीये. सूत्रांच्या मते, सेलिनाने काही दिवसांपूर्वी आपल्या फ्लॅटमध्ये (ज्यामध्ये सनी वास्तव्याला होती) सरप्राईज भेट दिली. त्यावेळी फ्लॅटमधील वॉशरुम बघून ती हैराण झाली. इतकेच नाही तर बाल्कनीतील फर्निचरलासुद्धा कीड लागलेली तिला दिसली. आपल्या फ्लॅटमध्ये पसरलेली घाण बघून तिचा पारा चढला आणि तिने तातडीने सनीला घर रिकामे करण्यास सांगितले. सेलिनाने घर रिकामे करुन घेतल्यानंतर आता सनी आपल्या पतीसोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये वास्तव्याला आहे. खरंतर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ठरल्यानंतरसुद्धा सनीला मुंबईतील रेसिडेंशिअल परिसरात भाडय़ाने किंवा खरेदी करण्यासाठी प्रॉपर्टी मिळत नाहीये. याचे कारण ठरले आहे तिची पोर्न स्टारची इमेज.
 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी