Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'सिलसिला’ चित्रपटाच्या आठवणींनी बिग बी भावुक

Webdunia
मंगळवार, 4 ऑगस्ट 2015 (12:48 IST)
अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा यांच्या भूमिकांमुळे गाजलेल्या 1981 च्या ‘सिलसिला’ चित्रपटाला 34 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने बिग बींनी चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. चित्रपटाशी निगडित आठवणी शब्दबद्ध करणे कठीण असल्याच्या भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केल्या. यश चोप्रा दिग्दर्शित ‘सिलसिला’ हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारित होता.

चित्रपटाचा नायक अमिताभ बच्चन यांच्या भावाच्या आकस्ङ्किक मृत्यूनंतर कुटुंबीयांच्या दबावामुळे मनाविरुद्ध भावाच्या नियोजित जोडीदाराशी लग्न करावे लागते. मोठय़ा पडद्यावरील बहुचर्चित प्रेमकथांपैकी एक अशा या चित्रपटात त्या काळातील सर्वात लोकप्रिय अशी अमिताभ-रेखाची जोडी मुख्य भूमिकेत होती. अमिताभ आणि रेखा यांचा ‘सिलसिला’ हा अखेरचा एकत्रित चित्रपट होता. यापूर्वी त्यांनी ‘मिस्टर नटवरलाल’, ‘दो अनजाने’, ‘मुकद्दर का सिकंदर’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र भूमिका केल्या होत्या. सिलसिला चित्रपटाचे पोस्टर शेअर करत बिग बींनी ‘प्रेम विश्वास आहे आणि विश्वास सदोदित राहतो’ असे म्हटले आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

विक्रांत मॅसी मुलासोबत वेळ घालवतानाचे पत्नीने ने शेअर केले फोटो

Met Gala 2024 : 1965 तासात तयार झाली आलियाची सुंदर साडी, 163 कारागिरांनी योगदान दिले

सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी पाचव्या आरोपीला अटक

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

रिॲलिटी शोमध्ये करण जोहरला रोस्ट केले, चित्रपट निर्माता संतापला

Show comments