Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘अनटोल्ड स्टोरी’ला ऑक्टोबरचा मुहूर्त

Webdunia
बुधवार, 21 जानेवारी 2015 (12:57 IST)
भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आधारित असलेला ‘द अनटोल्ड स्टोरी’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट यावर्षी 22 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत देशभरातील चित्रपट रसिकांसह क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिद्ध दिग्दर्शक नीरज पांडे सांभाळणार आहेत. चित्रपटात धोनीच्या भूमिकेत सध्याचा आघाडीचा अभिनेता सुशांतसिंग राजपूत दिसणार आहे. तर धोनीच्या पत्नीची म्हणजे साक्षी धोनीची भूमिका बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट साकारण्याची शक्यता आहे. याआधी आलियाने हायवे आणि टू-स्टेट्ससारख्या चित्रपटांमध्ये अभिनयाची वेगळी छाप पाडली होती. धोनीच्या आयुष्यावर चित्रपट म्हणजे पर्यायाने क्रिकेट आलंच. त्यामुळे धोनीच्या क्रिकेटमधील साथीदारांच्या भूमिकाही यात असणार आहेत. त्यामध्ये विराट कोहलीची भूमिका अभिनेता फवाद खान, तर अभिनेता गौतम गुलाटी हा जहीर खानच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. अफताब शिवदासनी जोगिंदर शर्माची भूमिका करताना दिसणार आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाचा पहिला पोस्टर गेल्या वर्षी 25 सप्टेंबरला प्रसिद्ध केला होता. धोनीच्या फॅन्ससह देशभरातील क्रिकेट चाहत्यांना ‘द अनटोल्ड स्टोरी’ची उत्सुकता लागलेली आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments