Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘बिग बी’ सोबत झळकणार अक्षरा आणि धनुष

Webdunia
बुधवार, 23 एप्रिल 2014 (14:52 IST)
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बीग बी अमिताभ बच्चन आणि निर्माता आर. बाल्की असे समीकरण तयार झाले आहे. बल्की यांचा सिनेमा म्हटले की, त्यामध्ये अमिताभ बच्चन नकी असणारच असे म्हटले जाते. बाल्कीच्या आगामी काळात येत असलेल्या या सिनेमात अमिताभ बच्चनसोबत तामिळी अभिनेता धनुष तसेच कमल हसनची कन्या अभिनेत्री अक्षरा काम करीत आहेत. आर. बाल्की यांच्या आगामी काळात येत असलेल्या सिनेमाची शूटिंग सध्या गोव्यात सुरू आहे. त्यासाठी बीग बी अमिताभ बच्चनसोबत सर्वजण गोव्यात आहेत.

बच्चनसोबत या सिनेमात अभिनेता रजनीकांत यांचा जावई तथा तामिळी अभिनेता धनुष तसेच कमल हसनची कन्या अभिनेत्री अक्षरा काम करीत आहेत. त्यामुळे सर्वाचे लक्ष या सिनेमाकडे लागले आहे. आर. बाल्की यांच्या ‘चिनी कम’ आणि ‘पा’ या सिनेमामध्येही यापूर्वी बीग बी अमिताभ बच्चळनने काम केले आहे. ‘भूतनाथ रिटर्न्‍स’ हा अमिताभचा नुकताच रीलीज झालेला सिनेमा असून बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून दमदार गर्दी खेचत आहे. बाल्की यांच्या नव्या सिनेमात अमिताभ आता नव्या अवतारात दिसणार आहे. त्यामुळे बच्चनच्या फॅनचे लक्ष या सिनेमाकडे लागून राहिले आहे.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments