Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘मुन्नी’नंतर ‘मीरा’ करतेय बॉलिवूडमध्ये एंट्री

Webdunia
सोमवार, 5 ऑक्टोबर 2015 (11:17 IST)
‘बजरंगी भाईजान’ सिनेमात ‘मुन्नी’ अर्थातच हर्षाली मल्होत्रानंतर टीव्हीची आणखी एक बालकलाकार सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार आहे. आम्ही टीव्हीवर प्रसारित होणार्‍या ‘मीरा’ शोमध्ये मुख्य भूमिका साकारलेली आणि ‘परवरिश: कुछ खट्टी कुछ मीठी’ फेम गिन्नी अर्थातच आशिका भाटियाविषयी बोलतो. ती सूरज बडजात्याच्या दिग्दर्शनाखाली तयार होणार्‍या ‘प्रेम रतन धन पायो’ सिनेमात सलमान खानच्या धाकटय़ा बहिणीचे पात्र साकारत आहे. असे आशियाने सांगितले, ‘सिनेमात मी सलमान खानची छोटी बहीण आहे. 
 
हा माझा पहिला सिनेमा आहे. याविषयी मी चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी उत्साही आहे.’ 
 
आशिकाच्या सांगण्यानुसार तिने सिनेमाचे शूटिंग खूप एन्जॉय केले. तिने सांगितले, ‘शूटिंगदरम्यान खूप मज्जा केली. मी दिग्गज कलाकारांकडून खूप काही शिकले. सलमान खान खूप चांगला स्टार आहे. त्याहीपेक्षा तो एक चांगला व्यक्ती आहे. मी आनंदी आणि नशीबवान आहे, की मला त्याच्यासोबत पदार्पण करण्याची संधी मिळाली. मला अनेक गोष्टी त्याच्याकडून शिकण्यास मिळाल्या.’ सूरज, गुजरातची रहिवासी आशिका केवळ 16 वर्षाची आहे.

ती 11वीमध्ये शिकत आहे. तिने करिअरची सुरुवात वयाच्या 9व्या वर्षी केली. ‘मीरा’ (2009-2010) तिचा पहिला टीव्ही शो होता. या शोमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. 2013 मध्ये ती क्राइम सीरिज ‘गुमराह’मध्ये दिसली. ‘परवरिश: कुछ खट्टी-कुछ मीठी’ (2011-2014) शोमध्येसुध्दा आशिका झळकली आहे. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments