Festival Posters

‘मैं सनी लिऑन बनना चाहती हूँ’

Webdunia
सोमवार, 12 ऑक्टोबर 2015 (10:10 IST)
‘मैं सनी लिऑन बनना चाहती हूँ’, असं कुठली मुलगी बोलत नाही. तर हे आहे एका हिंदी सिनेमाचं नाव. हा सिनेमा बॉलीवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिऑनच्या आयुष्यावर आधारित असणार आहे.
 
याआधी 2008 मध्ये ‘मैं माधुरी दीक्षित बनना चाहती हूँ’ हा अंतरा माळीचा सिनेमा आला होता. अंतरा माळीने एका छोट्या गावातून अभिनेत्री बनण्यासाठी आलेल्या तरुणीची भूमिका निभावली होती. मुंबईमध्ये येऊन माधुरी दीक्षितसारखी अभिनेत्री बनण्याचं स्वप्नं घेऊन ती आलेली असते. मात्र, या वाटचालीदरम्यान येणार्‍या अडचणी या सिनेमातून मांडल्या आहेत. या सिनेमाप्रमाणेच ‘मैं सनी लिऑन बनना चाहती हूँ’ हा सिनेमा येत आहे. बॉलीवूड अभिनेत्री सनी लिऑनवर आधारित हा सिनेमा असल्याचं बोललं जात आहे. 
 
सनी लिऑन प्रमाणे पॉर्न स्टार बनण्याचं स्वप्न बाळगणार्‍या एका तरुणीची कथा या सिनेमातून मांडली जाणार असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमात सनी लिऑनच्या भूमिकेत नवी अभिनेत्री असणार आहे, तर कांती शाह हा सिनेमा तयार करत आहेत. 
 
लो-बजेट सिनेमे बनवणारे निर्माते म्हणून कांती शाह यांची ओळख आहे. सनी लिऑनने या सिनेमाबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, सनी लिऑनचा पती डॅनियल या सिनेमाबाबत नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या सिनेमावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण ही थंड हवेची ठिकाणे कौटुंबिक सहलींसाठी उत्तम

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला

Show comments