Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Budget live : अरुण जेटली यांचे बजेट 2017-18चे मुख्‍य बिन्दु

Webdunia
- ५ ते १० लाख उत्पन्न व १० लाखांवरील उत्पन गटासाठी कररचेनत बदल नाही. ते अनुक्रमे २० व ३० टक्के राहणार.
- मध्यमवर्गीयांना करामध्ये सरकारने दिली सवलत.
- जास्तीत जास्त लोकांनी इन्कम टॅक्स भरावा यासाठी पहिल्यांदाच इन्कॅम रिर्टन फाईल करणा-यांची चौकशी होणार नाही.
- 50 लाख ते 1 कोटी करदायित्व असणा-यांना 10 टक्के सरचार्ज लागणार.
- एटीसी अंतर्गत गुंतवणूक केल्यास ४.५ लाख पर्यंत रक्कम असणा-यांवर ० टक्के कर.
- इन्कम टॅक्स स्लॅब : 2.5 ते 5 लाख उत्पन्नावरील करात 50 टक्के कपात, 5 टक्केच कर आकारला जाणार. यापूर्वी १० टक्के कर आकारला जात असे.
- राजकीय पक्षांना यापुढे चेक आणि डीजीटल माध्यमातून निधी स्वीकारावा लागेल.
- राजकीय पक्षांना २ हजार पेक्षा जास्त निधी रोखीत घेता येणार नाही.
- आता 3 लाखा पेक्षा जास्त व्यवहार रोखीने करता येणार नाही. राजकीय पक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी उचलले पाऊल.
- काळ्या पैशाच्या तपासासाठी विशेष तपास पथक.
- 50 कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांना आयकरामध्ये 5 टक्के सवलत, 30 टक्क्यावरुन दर कमी करुन 25 टक्के, 96 टक्के कंपन्यांना होणार फायदा.
- कॅपिटल गेन टॅक्सचा अवधी आता २ वर्षांपर्यंत.
- 1.48 लाख खात्यांमध्ये प्रत्येकी 80 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा. 1.09 कोटी खात्यांमध्ये 2 ते 80 लाखांपर्यंत रक्कम जमा.
- परवडणा-या घराची व्याख्या कारपेट एरियावरुन ठरणार. 
- वैयक्तिक प्राप्तीकर महसूलात नोटाबंदीमुळे 34.8 टक्क्यांची वाढ.
- 76 लाख लोकांनी आपले उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असल्याचे दाखवले.
- काळ्या पैशांविरोधात लढा देणे हीच आमची प्राथमिकता.
- 76 लाख लोकांनी त्यांचे उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त दाखवले.
- 99 लाख लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न फाइल केले, परंतु त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा म्हणजे, करमुक्त असल्याचे दाखवले.
- कर चुकवणा-या लोकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे त्यांचा भार प्रामाणिकपणे कर चुकवणा-यांवर येतो.
- 24 लाख लोकांचे उत्पन्न वार्षिक 10 लाख रुपयांपेक्षा जास्त दाखवतात.
- 1 लाख 74 हजार जणांनी आपले उत्पन्न 50 लाखांपेक्षा जास्त असल्याचे नमूद केले आहे.
- संघटित क्षेत्रात 4.1 कोटी कमर्चारी पण 1.74 कोटी कर्मचा-यांनीच रिर्टन फाईल केला.
- नोटाबंदीमुळे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅश जमा झाली असल्याने पुढील वर्षी महसुली तूट कमी होईल, अशी अपेक्षा.
- सध्या वित्तीय तूट 3.2 टक्के असून पुढच्यावर्षीपर्यंत 3 टक्क्याचे लक्ष्य गाठण्याचे उद्दिष्टय आहे.
- यावर्षी वित्तीय तूट १.९ टक्के.
- देश सोडून फरार झालेल्या आरोपींची संपत्ती जप्त करण्यासाठी विधेयक आणण्याचा विचार.
- संरक्षण क्षेत्रासाठी २ लाख ७४ हजार ११४ कोटींची तरतूद.
- यंदाच्या अर्थसंकल्पात एकूण 21 लाख 47 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक.
- सैनिकांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही.
- आता पोस्ट ऑफिसमधेही तुमचा पासपोर्ट बनवता येणार.
- IRCTCचे समभाग आता विक्रीस उपलब्ध, रेल्वेच्या इतर तीन कंपन्याही शेअर बाजारात येणार.
- रिझर्व्ह बँकेत डिजीटल पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड स्थापन करणार.
- पंतप्रधान मुद्रा योजनेसाठी 2.44 लाख कोटींची तरतूद.
- सरकारी संस्थांमध्ये डिजीटल व्यवहारांना चालना देणार.
- भीम आधारीत डिजीटल व्यवहारांना चालना देणार, आधारच्या माध्यमातून डिजीटल व्यवहाराचे लक्ष्य,यामुळे मोबाईल नसला तरी व्यवहार शक्य, 20 लाख सर्विस टर्मिनल्स उभारण्याचे उद्दिष्टय.
- भीम अॅपच्या प्रमोशनसाठी कॅशबॅक आणि बक्षीस योजना.
- सौर उर्जेत २३ हजार अतिरिक्त मेगावॉटची क्षमता.
- सायबर गुन्हे रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची घोषणा.
- वाहतूक क्षेत्रासाठी 2.41 लाख कोटींची तरतूद, भारत नेट प्रोजेक्टसाठी 10 हजार कोटींची तरतूद.
- पायाभूत सुविधांसाठी ३.९६ लाख कोटींची तरतूद.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी LIC पॉलिसीवर 8% टक्क रिटर्न मिळणार
- PPP मॉडेलनुसार छोट्या शहरांमध्ये विमानतळ उभारणार.
- 2014-15 पासून 1 लाख 40 हजार किमी लांबीचे रस्ते बांधले.
- राष्ट्रीय महामार्गांसाठी ६७ हजार कोटींची तरतूद.
- 2017-18 मध्ये 3500 किमीचे रेल्वे मार्ग उभारणार.
- राष्ट्रीय महामार्गांसाठी ६७ हजार कोटींची तरतूद.
- 2017-18 मध्ये 3500 किमीचे रेल्वे मार्ग उभारणार.
- मेट्रो रेल्वेसाठी नवीन धोरण आणणार.
- 25 रेल्वे स्थानकावर सरकते जिने आणि लिफ्ट बसवणार.
- IRCTCवरून ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही.
- पाचवर्षात 1 लाख कोटींचा रेल्वे सुरक्षा निधी उभारणार.
- पर्यंटन व तीर्थयात्रांसाठी नवीन खास, गाड्या सुरू करण्यात येणार.
- 2019 पर्यंत रेल्वेतील सर्व कोचमध्ये बायोटॉयलेट्सची सुविधा होणार उपलब्ध.
- ऊस उत्पादनासाठी ९ हजार कोटींची तरतूद.
- रेल्वे अर्थसंकल्प 1 लाख 31 हजार कोटींचा असणार, 55 हजार कोटी सरकार देणार.
- मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएटच्या जागा 5 हजारने वाढवणार.
- दलितांच्या कल्याणासाठी ५२, ३९३ कोटी रुपयांची तरतूद.
- झारखंड, गुजरातमध्ये दोन एम्स रुग्णालये स्थापन करणार.
- IIT, मेडिकल सह सर्व उच्चशैक्षणिक प्रवेश परीक्षा एकाच संस्थेकडून व्हाव्यात यासाठी 'राष्ट्रीय परीक्षा बोर्ड' स्थापन करणार.
- देशाबाहेर रोजगाराच्या संधी शोधणा-या युवकांसाठी देशभरात कौशल्य केंद्र स्थापन करणार.
- 2025 पर्यंत टीबी रोगाचा पूर्णपणे नायनाट करू.
- दूध प्रक्रिया उद्योगांसाठी 8 हजार कोटींची तरतूद
- झारखंड आणि गुजरातमध्ये 'एम्स' स्थापन करण्यात येईल.
- तरुणांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी 'स्वयम' योजना.
- गरोदर महिलांच्या खात्यात ६ हजार रुपये भरण्यात येतील.
- 14 लाख अंगणवाडी सेंटर्समध्ये 500 कोटी रुपये खर्चून महिला शक्ती केंद्राची स्थापना करणार.
- २०२२ पर्यंत ५ लाख लोकांना रोजगारासाठी ट्रेनिंग देण्याचे उद्दिष्ट.
- जानेवारीपर्यंत विदेशी चलन 361 अब्ज डॉलर्स इतके होते जे 12 महिन्यांच्या गरजेसाठी पुरेसे आहे.
- दीनदयाल ग्राम ज्योती योजनेसाठी ४८१८ कोटींची तरतूद. २०१८ पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचणार.
- ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे.
- 2017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद, 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवली.
- 1 कोटी कुटुंब गरिबीमुक्त करणं हे सरकारचं लक्ष्य.
- ग्रामविकासासाठी 3 लाख कोटी रुपये खर्च करणार.
- कंत्राटी शेतीसाठी नवा कायदा लागू होणार.
- 60 टक्के गावांमध्ये शौचालये उभारण्यात आली.
- ग्रामीण भागतील विजेसाठी 4500 कोटींची तरतूद.
- ग्रामीण, शेती क्षेत्रासाठी एकूण 1लाख 87 हजार 223 कोटींची तरतूद, मागच्यावर्षीपेक्षा 24 टक्के जास्त तरतूद.
- ६०० जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कौशल्य विकास केंद्र.
- पारदर्शी व्यवहारांसाठी डिजिटल इकॉनाॅमी
- मनरेगामध्ये महिलांचा सहभाग 55 टक्क्यांनी वाढला
- शाळांमध्ये विज्ञानाच्या शिक्षणावर जोर देण्यात येणार.
- पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद.

- १ कोटी कुटुंबासाठी मिशन अंत्योदय योजना
- शेती उत्पादनांची स्वच्छता आणि पॅकेजिंगसाठी 75 लाखापर्यंत अर्थसहाय्य करणार.
- पीक विम्यासाठी ९ हजार कोटींच्या निधीची तरतूद.
- गेल्या वर्षी मान्सूनचे चांगला झाल्याने यंदा पीके चांगली येण्याची अपेक्षा.
- मनरेगाच्या माध्यमातून ५ लाख तलाव बांधण्याचे लक्ष्य.
- मनरेगाच्या माध्यमातून ५ लाख तलाव बांधण्याचे लक्ष्य.
- डेअरी उद्योगाला नाबार्डच्या माध्यमातून 8 हजार कोटींची तरतुद, मायक्रो सिंचन निधीसाठी 5 हजार कोटींची तरतुद.
- शेतक-यानी घेतलेल्या कर्जावरील व्याजदरात कपात.
- शेतक-यांच्या कर्जासाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
- यावर्षी कृषीविकास दर ४.१ टक्के इतका असेल.
- टेक इंडिया हा सरकारचा आगामी काळातील अजेंडा.
- देशातल्या प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- करचुकवेगिरीमुळे देशातील जनतेचं मोठं नुकसान झाले.
- गरीबी निर्मुलन सरकारचे मुख्य लक्ष्य आहे.
- सरकारच्या सर्व योजना या गरीबांना लक्षात ठेवून आखल्या जातील.
- शेतक-यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आमच्या सरकारने अनेक पावले उचलली.
- शेतक-यांचे उत्पन्न पाचवर्षात दुप्पट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- नवी दिल्ली- नोटाबंदीचा निर्णय महत्त्वाचा आणि धाडसी, नोटाबंदीमुळे सरकारी महसूल वसुलीत वाढ- अरुण जेटली
- जनतेचा सरकावर विश्वास वाढला : अरुण जेटली 
- भारताकडे जागतिक विकासाचे इंजिन म्हणून बघितले जात आहे, मागच्यावर्षभरात अनेक सुधारणा झाल्या.
- आयएमएफनुसार आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती होत आहे.
- विकासाचे फायदे सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पावले उचलत राहणार - अरुण जेटली.
- एफडीआयमध्ये ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे - जेटली.
- जुलै 2016 मध्ये 6 टक्के असणारा महागाई दर डिसेंबर 1016 मध्ये 3.4 टक्क्यापर्यंत कमी झाला.
- येत्या दोन वर्षांत विकास ७ टक्क्यांवरून ७.८ टक्क्यांवर पोहोचेल .
- नोटाबंदीचे दूरगामी परिणाम होतील आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल, जे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत ठरतील - जेटली
- नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्था वेगानं वाढत आहे- अरुण जेटली
- हम आगे आगे चलते है, आईये आप असा शेर अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना ऐकवला.
- महागाई नियंत्रणात आणण्यात यश
- उत्पादन क्षेत्रामध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक - जेटली
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार जगातला जीडीपी 2017मध्ये 3.4 टक्क्यांपर्यंत वाढला आहे- जेटली
- नोटाबंदीच्या दरम्यान सहकार्य केल्याबद्दल देशाचे आभार : अरुण जेटली
- परदेशी गुंतवणूकीत वाढ झाली आहे - अरुण जेटली
- रेल्वे बजेट आणि केंद्रीय अर्थसंकल्प पहिल्यांदाच एकत्रित सादर होत आहे - जेटली
- मागच्या अडीचवर्षात सरकारच्या कारभारात बदल झाला असून, लोकांचा सरकारवरील विश्वास वाढला आहे - अरुण जेटली.
- जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडलेली असतानाच मी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहे - जेटली.
- महागाईवर सरकारने नियंत्रण मिळवले, काळयापैशा विरोधात सरकारने लढाई सुरु केली आहे - अरुण जेटली.
- गोंधळामध्येच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास केली सुरुवात.
सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांचा शानदार विजय

Maharashtra Election Result : महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

LIVE: महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून पुतणे युगेंद्र यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला

मी एक आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसे भेदायचे हे मला माहीत आहे-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments