Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Budget 2019 LIVE Updates: पियूष गोयल यांच्याकडून अर्थसंकल्प अर्थसंकल्प संसदेत सादर

Webdunia
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (12:44 IST)
स्वच्छ भारतासाठी लक्षणीय काम
- मोदी... मोदी... घोषणेनं सभागृह दणाणलं
- एका तासाच्या आत १ करोड रुपयांचं कर्ज मंजूर करता येईल - पीयूष गोयल
- बालविकास धोरणासाठी २७,५८४ कोटी
- ग्रामीण अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी 'मनरेगा' योजनेला अधिक निधी उपलब्ध करून देणार
- एका तासाच्या आत १ करोड रुपयांचं कर्ज मंजूर करता येईल - पीयूष गोयल
- ग्रामीण अधिकाधिक रोजगार निर्मितीसाठी 'मनरेगा' योजनेला अधिक निधी उपलब्ध करून देणार
- २०२२ मध्ये मानवाला अंतराळात पाठवणार
- सेंद्रीय शेतीवर भर
- स्वच्छ नद्या, स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचं उद्दिष्ट
- भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांवर भर देणार
- इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केल्यानं देश स्वावलंबी व्हायला मदत होईल
- परदेशातून इंधन आयात करणं कमी होईल
- पुढच्या पाच वर्षांत पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट 
- नव्या घरांवरचा जीएसटी कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न... मात्र हा निर्णय अद्याप विचाराधीन आहे... जीएसटी परिषद घेणार निर्णय 
- जानेवारी २०१९ मध्ये जीएसटी वसुली आत्तापर्यंत १ लाख करोडहून अधिक 
- एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी नोटबंदीनंतर पहिल्यांदा आयकर भरला 
- जीएसटी अंतर्गत घर खरेदीदारांना कसा फायदा मिळेल याचा अभ्यास मंत्रीमंडळाकडून केला जातोय 
- स्वातंत्र्यानंतर 'जीएसटी' ही करप्रणालीत झालेली सर्वात मोठी सुधारणा
- 'पंतप्रधान श्रमयोगी मानधन' ही पेन्शन योजना सुरू होणार... १० हजार कामगारांना होणार लाभ 
- ईपीएफओकडून कामगारांना सात हजारांपर्यंत बोनस देण्याचा निर्णय... 
- असंघटीत कामगारांना कमीत कमी ३ हजार रुपये पेन्शन... वयाच्या ६० व्या वर्षानंतर मिळणार फायदा
- नोकरीदरम्यान मृत्यू झाल्यास आर्थिक मदत २.५० लाखांवरून ६ लाखांवर केली
- ग्रॅज्युईटी १० लाखांवरून २० लाखांवर नेली
- सातवं वेतन आयोग मंजूर झाल्यानंतर सरकारनं लगेचच या शिफारशी लागू केल्या
- पाच वर्षांत औद्योगिक शांतता निर्माण केली
- कामगारांचं कल्याण हाच सरकारचा हेतू
- कामगारांकडेही सरकारचं विशेष लक्ष
- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा :  शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपयांची रक्कम थेट जमा होणार
- २ हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा
- तीन हफ्त्यांमध्ये जमा होणार रक्कम
- १२ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळणार... १ डिसेंबर २०१८ पासून योजना लागू
- शेतकऱ्यांसाठी ७५ हजार कोटींचं पॅकेज जाहीर
घोटाळेबाजांना आमच्या सरकारमुळे चाप बसला, त्या घोटाळेबाजांची आम्ही संपत्ती जप्त केली आहे- पीयूष गोयल
आज बँका कर्जवसुली करू शकत आहेत, जे लोक पैसे देत नव्हते, तेसुद्धा आता पैसे देत आहेत. बरेच जण कर्ज चुकवण्यासाठी पुढे सरसावले आहेत- पीयूष गोयल
महागाई कमी झाली नसती तर प्रत्येक कुटुंबाला आजच्या पेक्षा ३५ ते ४० टक्के जास्त खर्च करावा लागला असताः पीयूष गोयल
भारताची अर्थव्यवस्था वेगानं विकास करत आहे- पीयूष गोयल
गरिबांना आम्ही आरक्षण दिलं, परंतु आरक्षण व्यवस्थेत कोणतीही छेडछाड केली नाही, आम्ही मनरेगासाठी आणखी निधी देऊ- पीयूष गोयल
यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेवरील बोजा वाढला- पीयूष गोयल
- देशातील विदेशी गुंतवणुकीत वाढ
- बँकांच्या फेर महसुलीची व्यवस्था पूर्ण केली
- बँकिंग व्यवस्थेमध्ये कमालीच्या सुधारणा
- तीन बँकांवरील निर्बंध हटवले... अन्य बँकांवरील निर्बंधही लवकरच हटवले जातील
- बांधकाम क्षेत्रात 'रेरा'सह अन्य कायद्यांमुळे पारदर्शकता आली
- अगोदर छोट्या व्यावसायिकांवर ऋण फेडण्याचा दबाव होता आता मोठ्या व्यावसायिकांनाही ऋण फेडावं लागतंय  
शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि छोटे व्यापारी यांना आकृष्ट करण्यासाठी सरकारकडून नव्या तरतुदी  
- महसुली तूट ६ टक्क्यांवरून ३.४ टक्क्यांपर्यंत खाली आणली
- जीएसटीमुळे देशाच्या कररचनेत सुधारणा
- दहशतवाद, भ्रष्टाचाराला आळा घातला 
- २०२० पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार
- गेल्या पाच वर्षांत देशाला प्रगती पथावर आणलं
- मूलभूत सोई-सुविधांवर सरकारचा सर्वाधिक भर
- भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था
- महागाईचा दर कमी झाला
- आमच्या सरकारनं महागाईचं कंबरडं मोडलं
- शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ
- पीयूष गोयल यांनी अरुण जेटलींच्या स्वास्थ्य सुधारणेसाठी दिल्या शुभेच्छा
- पीयूष गोयल यांनी अंतरिम अर्थसंकल्पाच्या वाचनाला केली सुरुवात
- केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी
शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि छोटे व्यापारी यांना आकृष्ट करण्यासाठी सरकारकडून नव्या तरतुदी करण्यात येणार आहेत...
यूपीए सरकारमुळे अर्थव्यवस्थेचा बोजा वाढला - गोयल
भारत वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था - गोयल
जीएसटी लागू करणं सरकारसाठी मोठं पाऊल - गोयल 
महागाई कमी झाली नसती तर प्रत्येक कुटुंबाला आजच्यापेक्षा ३५ ते ४० टक्के जास्त खर्च करावा लागला असता -  पीयूष गोयल 
गेल्या पाच वर्षांत देशाला प्रगतीपथावर आणलं - गोयल
सरकारने महागाईचं कंबरडं मोडलं - गोयल 
अरुण जेटली यांच्या प्रकृतीसाठी गोयल यांनी दिल्या शुभेच्छा

- औषधं आणि उपकरणांच्या किंमती कमी केल्या

- गरीब आणि श्रीमंतांमधली दरी कमी करण्यासाठी काम केलं

- गरीब, मध्यमवर्गियांना स्वस्त धान्यासाठी १ लाख ७० हजार करोड 

- गावांमध्येही शहरासारख्याच योजना उपलब्ध करून देणार

- स्वच्छ भारतासाठी लक्षणीय काम

- देशातील विदेशी गुंतवणुकीत वाढ

संबंधित माहिती

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

पुढील लेख
Show comments