Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फोटोग्राफी एक उज्ज्वल करियर

- राहुल मिश्रा

Webdunia
NDND
फोटोग्राफी ही एक कला आहे. छायाचित्रकाला एक चांगली दृष्टी असावी लागते, असे म्हटले जाते. तसेच त्याने या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञानही अवगत करणे आवश्यक असते. मात्र फोटोग्राफी हे एकमेव माध्यम आहे की त्यात भाषेची आवश्यकता नसते. या क्षेत्रात शब्दापेक्षा प्रतिमेचा अधिक प्रभाव पडत असतो. एक छायाचित्रे दहा हजार शब्दांची गरज भागवते. फोटोग्राफी ही अशी कला आहे की त्यात आपल्याला उज्ज्वल करियर करण्‍याची संधी आहे.

एक यशस्वी छायाचित्रकार बनण्यासाठी आपल्याकडे वास्तविक सौंदर्य पाहण्याची दृष्टी व तांत्रिक ज्ञान आवश्यक आहे. आपले नाजूक डोळे कुठल्याही वस्तुचे छायचित्र व्हिज्यूलाईज करू शकतात. वरील सगळे गुण आपल्यात असून फोटोग्राफीमध्ये करियर करायची इच्छा आहे तर या क्षेत्रातील सगळी कवाडं आपल्यासाठी खूली आहेत...

आवश्यक पात्रता-
फोटोग्राफी हे एक क्रिएटीव्ह माध्यम असल्याने त्यासाठी विशेष पात्रतेची आवश्यकता नसते. आपली दृष्टी एखाद्या कविसारखी पाहिजे. 'जे ना देखे रवी... ते पाहे कवी !' असे म्हटले जाते. कवीकडे ज्याप्रमाणे नवीन पाहण्याची दृष्टी असते, त्याप्रमाणे छायाचित्रकाराची दृष्टी असायला पाहिजे.
फोटोग्राफीच्या प्रशिक्षणासाठी आपली शैक्षणिक पात्रता १०+२ असली पाहिजे. तसे पाहिले तर शाळेत विद्यार्थ्याना एक्स्ट्रा एक्टिव्हीटी म्हणून फोटोग्राफी शिकवली जाते. देशात फोटोग्राफीचा अभ्यासक्रम शिकवणार्‍या अनेक संस्था असून त्यात फोटोग्राफीतील पदवी, डिप्लोमा किंवा सर्टीफिकेट कोर्स उपलब्ध आहेत. फोटोग्राफीच्या अंगी कल्पनाशक्ती हा महत्त्वाचा गुण असतो. पुस्तकी ज्ञानापेक्षा त्याचा प्रात्याक्षिकाचे ज्ञानावर अधिक भर असतो.

जाहिरात, पत्रकारीता व फॅशनसोबत मॉडेलींग क्षेत्रात फोटॉग्राफीचे क्षेत्र कमा‍लीचे विस्तारले आहे. त्यामुळे या क्षेत्रात होतकरू तरूणासाठी मोठ्या प्रमाणात करियरच्या संधी उपलब्ध आहेत.

प्रेस फोटोग्राफर-
प्रेस फोटोग्राफरला 'फोटो जर्नलिस्ट' या नावाने ओळखले जाते. प्रेस फोटॉग्राफर स्थानिक व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तपत्र, मासिके तसेच वृत्तसंस्थेसाठी काम करत असतात. पत्रकाराप्रमाणे प्रेस फोटोग्राफरची ही प्रचंड धावपळ असते. कमी वेळात अधिक क्षण टिपण्यातच फोटोग्राफरचे कौशल्य असते.

फीचर फोटोग्राफर-
एखादी कथा विविध छायाचित्राच्या माध्यमातून प्रदर्शित करण्‍याची कला फीचर फोटोग्राफरच्या अंगी असते. फोटोग्राफरला संबंधित विषयाचे सखोल ज्ञान आवश्यक असते. छायाचि‍त्राच्या माध्यामतून विविध कथा, प्रसंग प्रेक्षकासमोर अथवा वाचकासमोर प्रसिद्ध केले जात असते. फीचर फोटोग्राफी क्षेत्रात विषय हे नेहमी बदलत असतात. वन्यजीवन, क्रीडा, यात्रा वृत्तांत, पर्यावरण यादी विषय असू शकतात.

कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल फोटॉग्राफर-
कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल फोटॉग्राफरचे कार्य एका ठराविक कंपनी किंवा कारखान्यासाठी चालत असते. गृहपत्रिका, जाहिराती, यंत्राचे छायाचित्रे काढणे आदी कामे त्यांना करावी लागतात. आपल्या उत्पादनाविषयी आकर्षक छायाचित्राच्या माध्यामातून जनतेला माहिती करून देणे, हे कमर्शियल फोटॉग्राफरचे मुख्य कार्य असते.

जाहिरात फोटॉग्राफर-
जाहिरात एजन्सी, मॉडेलिंग स्टुडिओमध्ये जाहिरात फोटोग्राफर नेमले जातात. बाजारात येणार्‍या नवीन उत्पादनाच्या लोकप्रियेतेमागे खरे कौशल्य जाहिरात फोटोग्राफरचे असते. त्यांचे कार्य सगळ्यात आव्हानात्मक असते.

फॅशन फोटॉग्राफ र-
NDND

फोटोग्राफी क्षेत्रात फॅशन फोटॉग्राफीची मोठी क्रेझ आहे. फॅशन क्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. स्मार्ट वर्क आणि चांगली मिळकत तसेच स्वत:चे नाव होण्यासाठी तरूण-तरूणी मोठ्या संख्येने 'फॅशन फोटोग्राफी' हे क्षे‍त्र करियर म्हणून निवडतात. मॉडेलिंगच्या क्षेत्रातील जाहिरात एजन्सी व फॅशन स्टुडिओमध्ये कुशल फोटॉग्राफरची नेहमी आवश्यकता भासत असते. फॅशन फोटॉग्राफरला मुंबई व दिल्ली सारख्या मोठ्या शहरातच जास्त कामे मिळत असतात. तसेच फॅशन हाउस, डिझायनर, फॅशन जर्नल्स, वर्तमानपत्रे, खाजगी वाहिनी येथेही फॅशन फोटॉग्राफरला संधी मिळत असते.

याचप्रमाणे पोर्टेट किंवा वेडींग फोटॉग्राफी, नेचर व वाईल्डलाईफ फोटॉग्राफी, फॉरेंन्सिक फोटॉग्राफी, डिजिटल फोटॉग्राफी, फाईन आर्ट्स फोटॉग्राफी, ट्यूरिष्ट फोटोग्राफी या विविध प्रकारातही आपल्याला करियर करता येते.

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

जन्मानंतर मुलाचा रंग काळा का दिसतो?

हृदयरोग्यांसाठी कोणती योगासने फायदेशीर आहेत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : झाडाची साक्ष

डॉ. राजेंद्र प्रसाद जयंती

मराठी साहित्यातील अजरामर कवियत्री बहिणाबाई चौधरी पुण्यतिथी

Show comments