suvichar

करिअर टिप्स :नृत्यात उत्तम करिअर बनवा

Webdunia
बुधवार, 30 जून 2021 (19:31 IST)
नृत्य करणे आपल्याला आवडते आणि हे आपले छंद आहे. तर आपण त्यात आपले उत्तम करिअर बनवू शकता.सध्या टीव्ही वर रियालिटी शो,गाणं आणि नृत्य या सारख्या क्षेत्रात करिअरचे नवीन मार्ग दिसत आहे.आता छोट्या शहरांमध्ये, गाव,खेड्यांतील तरुण देखील टीव्ही चॅनल वर प्रसारित होणाऱ्या रियालिटी शो मध्ये आपले कलागुण दाखवून पैसे आणि ख्याती मिळवत आहे. 
 
ट्रेंड बदलला आहे आणि आता टीव्ही चॅनेल्स मोठ्या शहरांमध्ये तसेच छोट्या शहरांमध्येही प्रतिभेच्या शोधात येऊ लागले आहे.
 
जर आपल्याला नृत्याची आवड आहे तर मग कठोर परिश्रम करा आणि स्वतःला जगासमोर सिद्ध करा.कारण आता नृत्यात देखील आपण आपले करिअर बनवू  शकता. 
 
बरेच तरूण आपल्या गरजा भागवण्यासाठी नोकरी करतात.पण त्यांची आवड काही वेगळी असते.जर आपल्याला नृत्याची आवड असेल तर आपण त्यामध्ये आपले उत्तम करिअर बनवू शकता.
 
पूर्वी नृत्याला चांगले मानत नव्हते,परंतु आता तरुण याला करिअर म्हणून स्वीकारत आहे.नृत्याची आवड असलेले तरुण या मध्ये सुवर्ण संधी करू शकतात. 
 
नृत्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी किमान बारावी पास असणे आवश्यक आहे. नृत्यातील सखोल ज्ञान व्यतिरिक्त, एखाद्याला संगीत नाद आणि नृत्य सादर करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.आपण सतत सराव करून उर्वरित गोष्टी सुधारू शकता, परंतु नृत्यासाठी आपल्या अंतःकरणात आवड असावी.तरच आपण या मध्ये आपले उत्कृष्ट करिअर बनवू शकता.
 
नृत्य कोर्सची प्रमुख संस्था खालील प्रमाणे आहेत-
 
* श्यामक डावर सालसा डान्स कंपनी, मुंबई.
* गंधर्व महाविद्यालय, नवी दिल्ली.
* म्हैसूर विद्यापीठ.
* कथक केंद्र, दिल्ली.
* झेनिथ डान्स ग्रुप अँड इन्स्टिट्यूट, पटना.
* कॉलेज आणि संगीत आणि ललित कला,रांची. 
* माधवी स्कूल ऑफ डान्स, जमशेदपूर.
* डान्स झोन प्रायव्हेट लिमिटेड, दिल्ली.
* बाबा भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठ,मुझफ्फरनगर येथून नृत्य पदवी किंवा डिप्लोमा मिळवून यामध्ये सुवर्ण करिअर बनवू शकतात.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात टाचांच्या भेगा वाढल्या आहेत? हे घरगुती उपाय देतील झटपट आराम!

Thyroid Symptoms in Women: वजन वाढणे ते थकवा... थायरॉईडची ही लक्षणे महिलांसाठी धोक्याची घंटा

औषधांशिवाय हात-पायांच्या दुखण्यावर मात करा; जाणून घ्या सोपी योगासने

हितोपदेशातील मनोरंजक कथा : वाईटापासून नेहमी दूर राहा

Watermelon Burfi थंड आणि गोड खायची इच्छा झाली, तर टरबूज बर्फी उत्तम आणि हटके पर्याय

पुढील लेख
Show comments