Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Career Tips दहावी नंतर काय करावं

student
, गुरूवार, 5 मे 2022 (09:14 IST)
बऱ्याच वेळा मुलांना 10 वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या समोर प्रश्न असतो की 10वी झाल्यावर कोणत्या विषयाची निवड करावी.जेणे करून पुढच्या भविष्यामध्ये त्याचा फायदा मिळेल. या साठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत. माहिती देत आहोत ज्यामुळे आपल्याला करिअर करण्यासाठी विषयाची निवड करता येईल. 
 
* विज्ञान विषय- जर आपण 10 वी उत्तीर्ण  झाल्यावर विज्ञान विषयाची निवड करता तर आपल्याला या साठी 2 पर्याय मिळतात.गणितशास्त्र किंवा जीवविज्ञानशास्त्र.आपल्याला वैद्यकीय मध्ये जायचे असेल तर आपण जीवविज्ञान विषय घेऊ शकता. तकनीकी क्षेत्रात जायचे असल्यास गणित विषय घ्यावे.   
 
* कॉमर्स -जर आपण बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित आहात तर आपण कॉमर्स विषय घेऊ शकता.आपण कॉमर्ससह कॉम्प्युटर अप्लिकेशन,टॅक्स,ओनर्ससह करू शकता.12 वी नंतर आपल्याला BBA आणि MBA  हे व्यावसायिक पाठयक्रम करण्यात त्रास होत नाही.
 
* कला विषय-10 वी नंतर कला विषय देखील घेऊ शकता.या मध्ये इतिहास,भूगोल,अर्थशास्त्र,राजनीतिशास्त्र,विषय येतात.प्रशासनिक सेवेसाठी आर्ट किंवा कला विषय घेणे योग्य राहील.हे विषय घेऊन आपण अर्थशास्त्र ,राजनीती मध्ये करिअर बनवू शकता.
 
* कॉम्प्युटर हार्ड वेयर आणि नेटवर्किंग-आजच्या कॉम्प्युटर युगासाठी हे पर्याय योग्य आहे. या क्षेत्रात आपण कॉम्प्युटरशी निगडित माहिती मिळवता.या मुळे चांगली नोकरी मिळू शकते.
 
* हॉटेल मॅनेजमेंट-जर आपल्याला या क्षेत्रात करिअर करावयाचे आहे तर आपण हॉटेल मॅनेजमेंट मध्ये डिप्लोमा करू शकता.या मुळे आपल्याला कामाच्या बऱ्याच संधी मिळू शकतात. 
 
* इंजिनियरिंग डिप्लोमा-बरेच पॉलिटेक्निक महाविद्यालय आणि संस्थान 10 वी नंतर डिप्लोमा करवतात.हे केल्यावर आपल्याला थेट BE मध्ये प्रवेश मिळते.आपण या क्षेत्रात नोकरी देखील करू शकता.
 
* आयटीआय -आपल्याला 10 वी नंतर असा कोर्स करू इच्छित आहात ज्या मुळे आपल्याला लवकर नोकरी मिळावी.तर या साठी आपण आयटीआय करू शकता.आयटीआय आपण इलेक्ट्रिशियन, वेल्डर,फिटर,कार्पेन्टर,मॅकेनिक,स्टेनो,कॉम्प्युटर या क्षेत्रात करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Marriage Anniversary Wishes In Marathi लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा