Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्योग निरीक्षक पदासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

Webdunia
मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (21:39 IST)
मुंबई – महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – 2021 मधील उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे.
 
या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही वेबलिंक दिनांक 20 डिसेंबर, 2022 रोजी 12.00 वाजेपासून दिनांक 26 डिसेंबर, 2022 रोजी 11.59 (रात्री) वाजेपर्यंत सुरु राहील.
 
भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या 1800-1234-275 किंवा 7303821822 या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support-online@mpsc.gov.in या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल, असे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून कळविण्यात आले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

खजुराचा हलवा रेसिपी

Children's Day 2024 Wishes In Marathi बालदिनाच्या शुभेच्छा

Career in BA Astrology: ज्योतिष अभ्यासक्रम मध्ये बीए

World Diabetes Day 2024 : जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो, प्रकार, कारणे आणि उपचार जाणून घ्या

Saree Styling : साडी स्टायलिंगसाठी या 8 खास टिप्स तुमचे व्यक्तिमत्व बदलतील

पुढील लेख
Show comments