Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एएफएमसीच्या डॉक्टरांना मिळते प्रतिष्ठा

Webdunia
ND
डॉक्टर होण्यासाठी तर आज विविध मार्ग उपलब्ध आहेत. मात्र, विद्येचे माहेरघर असणार्‍या पुण्यातील 'आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज' मधून डॉक्टर झालेल्यांना जी प्रतिष्ठा मिळते ती कुठल्याच इन्स्टिट्यूटमधून झालेल्या डॉक्टरांना मिळत नाही. वैद्यकीय क्षेत्रात करियर घडविण्यास इच्छूक असलेल्यांसाठी पहिल्या पसंतीचे मेडिकल कॉलेज म्हणून एएफएमसी या इन्स्टिट्यूटला मान मिळला आहे.

इतिहास
' आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज'ची स्थापना 1948 मध्ये आर्मी मेडिकल ट्रेनिंग सेंटर, दी आर्मी स्कूल ऑफ हायजीन, दी सेंट्रल मिलिट्री पॅथॉलॉजी लॅब्रोटरी, दी स्कूल ऑफ ब्लड ट्रांसफ्यूजन व आर्मी स्कूल ऑफ रेडियोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमातून झाली. सुरवातीला येथे केवळ पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनिंग व रिसर्च सेंटर होते. त्यांनर 1955 च्या मे महिन्यात डिपार्टमेंट ऑफ डेंटल सर्जरी सुरू करण्यात आले.

व्ही के कृष्ण मेनन यांच्या हस्ते 4 ऑगस्ट,1962 रोजी अंडर ग्रॅज्युएट बिल्डींगचे उद्‍घाटन झाले. 1998 मध्ये एएफएमसीने आपला रौप्य महोत्सव मोठ्या थाटात साजरा केला. कार्यक्रमाला उद्‍घाटक म्हणून भारताचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस उपस्थित होते. नॅशनल प्रिमियम इन्स्टिट्युट म्हणून एएफएमसीची जगात ओळख आहे.

एम.बी.बी.एस अभ्यासक्र म
आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजला भारत सरकार संरक्षण मंत्रालयातून आलेल्या पत्रानुसार आ.जा.क्रमांक 11984/ डीजीएएफएमएस/ डीजी 3 (बी)/ 9718/ डी (मेडि) दिनांक 4 जुलै, 1962च्या अंतर्गत अंडर ग्रॅजुएट कोर्सला मान्यता मिळाली आहे.

कोर्सचा कालावधी : एएफएमसीद्वारा संचालित एम.बी.बी.एस या अभ्यासक्रमाचा कालावधी साडेचार वर्ष आहे. त्यानंतर प्रात्या‍क्षिक म्हणून एक वर्ष इंटर्नशिप करावी लागते.

सेवा व्रत : आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस झालेल्या विद्यार्थ्यांना आर्म्ड फोर्स मेडिकल सर्विसेसमध्ये मानधनावर रूग्णांना सेवा देणे अनिवार्य आहे. यासाठी विद्यार्थ्यांला महाविद्यालयात प्रवेश निश्चित करते वेळी स्वाक्षरीसह सेवा व्रताचा बॉंड लिहून द्यावा लागतो.

पात्रता : विद्यार्थ्यांने भारताचे नागरिकत्व स्विकारलेले असावे. तो नेपाळ किंवा भूतानचाही नागरिक असू शकतो. पाकिस्तान अथवा अन्य कुठल्या देशातील स्थायी निवासानिमित्त आलेला भारताचा मूळ निवासी असला पाहिजे.
- तो अविवाहित पाहिजे.
- सरंक्षण मंत्रालयाच्या पात्रतेनुसार शरीरयष्टी हवी.
- प्रवेश करीत असलेल्या वर्षी म्हणजे 31 डिसेंबरला उमेदवाराचे वय 17 ते 22 वर्ष असले पाहिजे. बी एस्सीनंतर प्रवेश घेणार्‍या उमेदवाराचे वय 24 वर्षांपेक्षा जास्त नसले पाहिजे.
सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ब्युटी सिक्रेट्स: या सोप्या पद्धतीने काही मिनिटांत घरच्या घरी चमकणारी त्वचा मिळवा

महिलांनी स्तनपान करताना ब्रा घालणे योग्य आहे की नाही?जाणून घ्या

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार

Show comments