Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किचनमधलं करीअर कसं कराल ...

Webdunia
शनिवार, 5 मार्च 2016 (12:36 IST)
प्रत्येकाला आयुष्यात कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असतेच. त्यामुळे अनेकजण आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडून त्यात करिअर करून पुढे जात असतात. पण स्वयंपाकघरात वेगवेगळे पदार्थ बनवण्याच्या कलेत कसलं आलंय करिअर? असा आपला समज होऊ शकतो. परंतु ही आवडही आपलं करिअर बनवू शकते, यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. 
 
कसं कराल हे करीअर... 
 
प्रत्येकाला आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायला आवडतं. त्यासाठी आपल्या आवडीनिवडीनुसार प्रत्येकजण आपलं शिक्षण त्याच क्षेत्रात पूर्ण करून आपल्या करीअरच्या वाटा ठरवत असतात. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवण्याची आवड असते. परंतु ती आवड आपण अनेकदा आपल्या घरापुरतीच मर्यादीत ठेवत असतो. त्याकडे करिअरच्या दृष्टीकोनातून कधीच पाहत नसतो. घरात अनेक महिला वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्यात अगदी तल्लीन असतात. त्यासाठी त्यांच्या या कलेचं अनेकांकडून तोंडभरून कौतुकही होत असतं. तू अगदी अन्नपूर्णा आहेस, अशाप्रकारची शाबासकीही मिळत असते. मात्र, यामध्ये ही आपल्याला करीअर करता येऊन चांगला पैसा मिळवता येवू शकतो, याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. पण त्यात करिअर करायचं ठरवलं आणि ते पूर्ण केलं, तर मात्र तुम्ही स्वत:वरच जाम खूश व्हाल. या क्षेत्रात जाण्यासाठी या काही टिप्स... 
 
शेफ : आपल्याला वेगवेगळ्या पदार्थांच्या डीश बनवण्याची आवड असेल, तर कुकिंगच्या क्षेत्रात आपल्याला शेफ या पदापर्यंतही पोहचता येऊन त्यात करिअर करता येऊ शकते. 
 
फूड क्रिटिक : फूड क्रिटिकसाठी आपल्याकडे लिहिण्याच्या आवडीबरोबरच अभिव्यक्तीची कला अवगत असणे आवश्यक आहे. ज्यामुळे आपल्याला लिखाणाच्या माध्यमातून पदार्थांच्या रेसिपीज लोकांपर्यंत पोहचवता येतील. या पदासाठी सध्या खूप मागणी असलेली पाहायला मिळतेय. 
 
न्युट्रिशनिस्ट : ज्या वेळी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थ बनवण्याच्या कलेबरोबरच आपल्याला त्याविषयी इतरांना चांगल्याप्रकारे माहीती देता येत असेल, तर त्यात फक्त अन्नपदार्थांवरच नाही, तर आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक अशा पदार्थांविषयीची माहीती लोकांना देता येऊ शकते. आपल्याला करिअर करण्याची ही एक चांगली संधी आहे. 
 
फूड स्टायलिस्ट : यामध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्याबरोबरच त्याचे प्रेझेंटेशनही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी फूड स्टायलिस्टच्या माध्यमातून आपल्याला मोठमोठ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, तसेच वर्कशॉप्समध्ये आपल्या पदार्थांविषयीची माहीती 
पोहोचवता येऊ शकते. 
 
ऑर्गेनिक फार्मिंग : एखाद्याला ट्रॅव्हलिंग करण्याची आवड असेल, तर त्यासाठी ऑर्गेनिक फार्मिंग हा पर्याय अत्यंत उत्तम आहे. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी हा एक चांगला मार्ग तर आहेच, परंतु यामध्ये करिअर करून स्वत:ला एक चांगला फूडप्रेी म्हणून नवी ओळखही निर्माण करता येऊ शकते. 
 
केटरर : यामध्ये आपल्याला स्वत:चा व्यवसाय करता येऊन चांगल्याप्रकारे पैसे मिळवता येतील. लग्न, पाट्र्या तसेच काही कार्यक्रमांध्ये आपल्याला एक चांगली सेवा देता येईल. व्यवसाय पुढे नेण्यास त्याची मदत होते. 
 
बेकर : चांगल्या बेकर्सला या क्षेत्रात नेहमीच मागणी असते. केक, नानकटाई तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या कुकीज प्रत्येक ठिकाणी मिळतात. त्यासाठी तुम्ही एक चांगला बेकर असाल तर त्यामध्ये चांगले करिअर करता येऊ शकते. 
 
आइस्क्रिम टेस्टर : अशाप्रकारचा जॉब असतो हे ऐकायला जरी नवीन वाटत असले, तरीही यामध्येही चांगल्याप्रकारे जॉब करता येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला स्वीट पदार्थांची आवड असणे आवश्यक आहे. 
 
चॉकलेटीयर : यामध्ये आपल्याला चॉकलेटच्या काही कन्फेशनरीज बनवता यायला हव्यात. त्यासाठी चॉकलेटची आवड असणे आवश्यक आहे. 
 
फूड फोटोग्राफर : नेहमीच काहीतरी क्रिएटीव्ह करू इच्छिणा-या लोकांना फूड इंडस्ट्रीमध्ये जॉबची कमी नाही. त्यामध्ये वेगवेगळ्या डिशेसचा आस्वाद घेत असतानाच आपली फोटोग्राफीची आवडही आपल्याला पूर्ण करता येऊ शकते. त्यासाठी रेस्टॉरंट्स किंवा मॅगझीन्समध्ये मागणी असते.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

Show comments