Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केंद्र सरकारच्या 'ग्यान' प्रकल्पांतर्गत शिवाजी विद्यापीठाचे तीन प्रस्ताव मंजूर

Webdunia
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2015 (16:43 IST)
देशातील वीस विद्यापीठांमध्ये समावेश; आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ करणार मार्गदर्शन
ऑक्टोबर: केंद्र सरकारच्या नूतन व अभिनव अशा 'ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ ॲकेडेमिक नेटवर्क्स' (GIAN- ग्यान) या योजनेअंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या तीन प्रस्तावांना अंतिम मंजुरी मिळाली आहे. दहा दिवसांपेक्षाही कमी इतक्या विक्रमी वेळेत प्रस्ताव मंजूर झाल्याने विद्यापीठातील संशोधकांचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
 
केंद्रीय उच्चशिक्षण मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी गोवा येथे नुकत्याच झालेल्या शिक्षणतज्ज्ञांच्या परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांच्या ज्ञानाचा लाभ सार्वजनिक विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनाही व्हावा, या हेतूने 'ग्यान' उपक्रमाची घोषणा केली. आयआयटी, आयआयएम, आयसीईआर, एनआयआयटी यांच्यापलीकडे देशातील विविध सार्वजनिक विद्यापीठांसाठी विशेषत्वाने 'ग्यान' असेल, असे त्यांनी सांगितले. यासाठी विद्यापीठांचे 'नॅक' मानांकन, त्यांचे महत्त्वपूर्ण सामंजस्य करार आदी निकषांवर पहिल्या टप्प्यात देशातील वीस विद्यापीठांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचा समावेश आहे.
 
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना दि. २२ सप्टेंबर रोजी इ-मेलद्वारे या उपक्रमात सहभागाविषयी भारतीय विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) माहिती प्राप्त झाली. त्यांनी लगोलग सर्व विभागप्रमुखांना ती ई-मेल पाठविली. याला प्रतिसाद मिळून विद्यापीठामार्फत एकूण नऊ प्रस्ताव 'ग्यान' प्रकल्पासाठी सादर झाले. आयआयटी (खरगपूर) 'ग्यान' प्रकल्पासाठी नोडल संस्था म्हणून काम पाहात आहे. २८ सप्टेंबरला दिल्ली येथे झालेल्या बैठकीत त्यापैकी ३ प्रस्तावांना हिरवा कंदील मिळाला आहे. उर्वरित प्रस्तावांना प्राथमिक मंजुरी प्राप्त झाली आहे.
 
चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टीम (सीबीसीएस) अधिक प्रभावी व दर्जेदार करण्याचे काम 'ग्यान' उपक्रमांतर्गत होणार आहे. या अंतर्गत एक क्रेडिट व दोन क्रेडिटचे अनुक्रमे सात व बारा दिवसांचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार असून ते शिकविण्यासाठी परदेशातील तज्ज्ञ प्राध्यापक व संशोधकांना पाचारण करण्यात येणार आहे. त्यांना स्थानिक प्राध्यापक लोकल होस्ट म्हणून सहकार्य करतील. याअंतर्गत दररोज दोन तास शिकविण्यात येणार असून अखेरच्या दिवशी विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल. अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त ५० विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. त्यापैकी ५० टक्के विद्यार्थी अन्य विद्यापीठांतील असणे बंधनकारक आहे. या सर्व सत्रांचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार असून साक्षात, स्वयम् तसेच नॅशनल डिजिटल लायब्ररी आदी उपक्रमांसाठीही त्यांचा वापर करता येणार आहे. तसेच, भावी काळात त्यांवर आधारित लघु अभ्यासक्रम राबविण्याचाही युजीसीचा मानस आहे. 
 
शिवाजी विद्यापीठाला मंजूर झालेले अभ्यासक्रम आणि परदेशी तज्ज्ञ मार्गदर्शक पुढीलप्रमाणे: १. कॅन्सर ॲन्ड न्युरॉलॉजिकल नॅनो-टेक्नॉलॉजी: फ्रॉम बेसिक टू ट्रान्सलेशनल ॲन्ड क्लिनिकल सायन्सेस, तज्ज्ञ मार्गदर्शक: फ्रँकॉइस बर्जर, युनिव्हर्सिटी ऑफ ग्रेनोबल, फ्रान्स (होस्ट फॅकल्टी: प्रा. आर.के. कामत व प्रा. पी.एस. पाटील), २. इव्हॉल्युशन मॉर्फोलॉजी ऑफ लॅन्ड प्लँट्स, तज्ज्ञ मार्गदर्शक: दीमित्री सोकोलॉफ लोमोनोसोव्ह, मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी, रशिया (होस्ट फॅकल्टी: प्रा. एस.आर. यादव), ३. जिऑग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम्स फॉर वॉटर रिसोर्सेस मॅनेजमेंट, तज्ज्ञ मार्गदर्शक: प्रा. वेंकटेश मेरवाडे, पर्ड्यु युनिव्हर्सिटी, इंडियाना (होस्ट फॅकल्टी: डॉ. सचिन पन्हाळकर)
विद्यापीठातील प्राध्यापकांचा अभिमान: कुलगुरू डॉ. शिंदे
 
केंद्र सरकारच्या 'ग्यान' प्रकल्पाच्या पहिल्याच टप्प्यातील वीस विद्यापीठांमध्ये शिवाजी विद्यापीठाची निवड होणे आणि आठ दिवसांत पाठविलेल्या प्रस्तावांना मंजुरी मिळणे या दोन्ही गोष्टी अत्यंत अभिमानास्पद आहेत. विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी अत्यंत जबाबदारपूर्वक तयार करून पाठविलेले प्रस्ताव कोणत्याही बदलाविना जसेच्या तसे मंजूर झाले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ विद्यापीठात येऊन मार्गदर्शन करतील. विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक संबंध निर्माण होण्यास 'ग्यान'चा लाभ होणार आहे. या यशाबद्दल विद्यापीठातील प्राध्यापक अभिनंदनास पात्र आहेत, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

Show comments