Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टेक्निकल राइटिंग : सुवर्ण करियर

Webdunia
ND
टेक्निकल रायटर तांत्रिक सुविधा निर्माण करतो ज्यात तो काम करतो आणि लिहितो. त्याला टेक्निकल कम्युनिकेशन किंवा तांत्रिक संप्रेषण म्हटले जाते. टेक्निकल राइटिंग किंवा टेक्निकल कम्युनिकेशनचा अर्थ वाचकांना आपले विचार सहज समजावे अशा आहे. सध्याच्या वाढत्या औद्यागिक युगात टेक्निकल रायटरचे महत्त्व वाढत आहे.

टेक्निकल रायटर विविध अहवाल तयार करण्याचे काम करतो ज्याचा वापर की व्यावसायिक/ विशेषज्ञ आपल्या कामात नियमित करतात. मैन्युअल्स, प्रोजेक्ट रिपोर्ट्स, ऑनलाईन हेल्प फाइल्स तयार करण्याचे काम टेक्निकल रायटर करतो. आईटी, कंज्युमर प्रॉडक्ट्स, मेडिकल, जर्नल्स, ग्रॉफिकल प्रेझेंटेशनसुद्धा टेक्निकल रायटर तयार करतो. इंजिनिअर बरोबर काम करणारा टेक्निकल रायटर सामान्य लोकांसाठी इंजिनिरिंग तथा डिजाइनिंग बाबत लेखन करण्याचे काम करतो. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन एखादे उत्पादन उपयोग आणण्याच्या कामात टेक्निकल रायटर मदत करतो. तो या क्षेत्रातील तज्ज्ञ नसला तरी त्याला उत्पादनाच्या ज्ञानाबरोबर औद्यागिक बाजूचेही चांगले ज्ञान असावे लागते.

पात्रता: टेक्निकल कम्युनिकेशनच्या क्षेत्रात काम करण्यासाठी कोणत्याही औपचारिक शिक्षणाची आवश्यकता नाही. पत्रकारिता आणि जनसंवादचा पदवी किंवा पदविका धारक तसेच इंग्रजी साहित्य, विज्ञान, आईटीचा पदवीधारक या क्षेत्रात काम करू शकतात. टेक्निकल रायटर म्हणून काम करताना इंग्रजी भाषेचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. या व्यवसायात संगणक साक्षरता आवश्यक आहे. काही विद्यापीठांमध्ये जनसंवाद विभागात टेक्निकल राइटिंगचे सर्टिफिकेट कोर्स चलविले जातात

केरळ विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ मॉस कम्युनिकेशनमध्ये टेक्निकल राइटिंगचा एक वैकल्पिक विषय असतो. चेन्नईमधील स्टेला मॉरिस कॉलेज द्वारा टेक्निकल राइटिंगचा अभ्यासक्रम चालविला जातो. विदेशातील अनेक संस्थामध्ये टेक्निकल राइटिंगचा डिग्री डिप्लोमा आणि सर्टिफिकेट अभ्यासक्रम चालविला जातो. तसेच याबाबत ऑन लाइन अभ्यासक्रमही उपलब्ध आहे.

टेक्निकल रायटर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष ग्राहकवर्गाकडे लक्ष देऊन लेखन करावे लागते. सोप्या, सहज भाषेत आपला संदेश ग्राहकांपर्यंत पोहचावा लागतो. तांत्रिक अहवाल तयार करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य जसे हेडिंग, लिड, ग्रॉफिक्स याचा वापरही करावा लागतो. यामुळे अभ्यासक्रमात माइक्रोसॉफ्ट वर्ड, पेज मेकर, फ्रेम मेकर, रॉब हेल्प तथा फ्रंट पेज सारख्या सॉफ्टवेयर टूल्स शिकविले जातात.

रोजगाराच्या संधी : टेक्निकल रायटर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना जाहीरात संस्था, सॉफ्टवेअर उद्योग, वृत्तपत्रे, मासिके यांच्यात रोजगाराची संधी उपलब्ध आहे. टेक्निकल रायटरची सर्वात जास्त मागणी आयटी उद्योगात आहे. तसेच फ्रिलांसर टेक्निकल रायटर म्हणूनही काम करू शकतात. फ्रिलांसर रायटरला कामानुसार मोबदला मिळतो. फ्रिलांसर म्हणून काम करताना कंपनीने दिलेल्या वेळेत काम पूर्ण करावे लागते. त्यासाठी तुमच्याकडे संगणक व इंटरनेटची सुविधा असणे आवश्यक आहे.

इवेल्यूशन आणि फिसिबिलिटी रिपोर्ट, प्राइमरी रिसर्च रिपोर्ट, टेक्निकल बॅक ग्राउंड रिपोर्ट, प्रोग्रेस रिपोर्ट, बिझनेस प्लान, यूजर्स गाइड सारखी कामेही टेक्निकल रायटर करावी लागतात. टीसीएस, इंफोसिस टेक्नॉलॉजीस लिमिटेड, सन माइक्रोसिस्टम्स, इंफोटेक सारख्या भारतीय कंपन्यांमध्ये टेक्निकल रायटर म्हणून चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

सर्वांना आवडेल अशी झटपट मुगाच्या डाळीची चकली

Conceive Quickly गर्भधारणा करायची असेल तर संबंध ठेवल्यानंतर किती पडून राहणे आवश्यक जाणून घ्या

Winter Special Recipe: गाजर हलवा

व्यावसायिक पायलट होण्यासाठी प्रक्रिया जाणून घ्या

या फळात आहे पुरुषांच्या 5 समस्यांवर उपाय, जाणून घ्या

Show comments