राजू श्रीवास्तव हे आजचे चलनी नाणे आहे. 'लाफ्टर चॅलेंज'मधून पुढे आलेला राजू खरे तर बर्याच वर्षांपासून या क्षेत्रात आहे. पण 'लाफ्टर' मुळे त्याला जगव्यापी ओळख मिळाली. आज हा विनोदवीर 'आमचा हसविण्याचा धंदा' म्हणत देशभर फिरतो आहे. अनेक वाहिन्यांवर त्याचे कार्यक्रम सुरू असतात. आता त्याचा नवा शो 'राजू हाजीर हो' एनडीटिव्ही इमेजिन या वाहिनीवर सुरू झाला आहे. या निमित्ताने राजूशी 'वेबदुनिया'ने बातचीत केली. त्याच्याशी साधलेला हा संवाद....
आपल्या नवीन 'शो'विषयी काही सांगाल ? एनडीटीव्ही इमेजिनवर माझा नवीन शो 'राजू हाजीर हो' सुरू होत आहे. याच्या प्रत्येक भागात दोन प्रमुख पाहुणे असतील. शोमध्ये पाहुणे आणि मी असे तीन जण परफॉर्मंस देतील. आतापर्यंत या शोचे आम्ही 20 भाग शूट केले आहेत.
' शो'साठी आपण वेगवेगळ्या शहरात जात आहात का? हो लोकांना भेटणे ही माझी आवड आहे. प्रत्येक शहरात माझे मित्र आहेत. त्या सगळ्यांमध्ये मी हास्य शोधत असतो. 'राजू हाजीर हो'ला जिवंतपणा येण्यासाठी मी गेल्या सहा महिन्यापासून छोट्या पडद्यावर आलो नाही.
WD
WD
हल्ली चित्रपटामध्ये नायकच कॉमेडी करत असल्याने विनोदी कलाकारांना संधी कमी मिळते? त्याने काहीच फरक पडलेला नाही. मला तर असे वाटते, माझ्यासारख्या स्टॅन्डअप कॉमेडियन्सने चित्रपटात जायलाच नको. कारण जनतेमध्ये जाऊन त्यांना हसविण्याचे काम त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. भविष्यात एक दिवस असा येईल की, चित्रपट निर्माताच आम्हाला घेऊन चित्रपट काढेल. त्यावेळी आम्हाला समाधान लाभेल. परदेशात स्टॅन्डअप कॉमेडियनला खूप मान आहे. त्याला चित्रपटाची मदत मुळीच घ्यावी लागत नाही.
टिव्हीच्या माध्यमातून चांगले विनोदी कलावंत मिळतात काय ? गेल्या काही दिवसात इतके विनोदी कलाकर मिळाले आहेत की, कॉमेडी इंड्रस्टी तयार झाली आहे. मिमिक्री कलाकार आता स्टॅन्डअप कॉमेडियन म्हणून ओळखले जातात. आता विनोदाचे अभ्यासक्रम शिकवणार्या संस्था सुरू होतील.
विनोदी कलाकारांना इतर कलाकारांच्या तुलनेत कमी प्रतिष्ठा मिळते? त्यात काही परिवर्तन घडून येईल काय? हो नक्कीच! जनतेच्या मनात विनोदी कलाकारांना स्थान मिळत आहे. त्यांच्या कलेला दाद मिळत आहे. भविष्यात विनोदी कलाकारांना सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास आहे.
चुटके तयार करताना काही संदेशही देता काय? का नाही! आमचे तर ते कर्तव्यच आहे. जनतेसमोर चुटके सादर करताना हशे मिळतवोच. पण त्या माध्यमातून त्यांचे प्रबोधनही करतो. प्रत्येक कलाकाराने समाजप्रबोधन तर केलेच पाहिजे. मी या मताचा आहे.
आपला आवडता कॉमेडियन कोण ? किशोर कुमार, मेहमूद व जॉनी लीवर, हे माझे सर्वात आवडते कॉमेडियन आहे. स्टेजवर जो परफॉर्म करतो त्याचा तर मी 'आशिक' आहे. स्टेजवरील परफॉर्मचा फक्त काही अंशच ते चित्रपटात देऊ शकतात.